घृणास्पद ! ‘पॉर्न’ साईटवर हैदराबादच्या पिडीतेचा व्हिडिओ लोकांकडून केला जातोय ‘सर्च’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या दुष्कर्मानंतर त्याविरोधात संपूर्ण देशात संताप वक्त होत आहे. महिला सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आणखी धक्कादायक बाब समोर येत आहे जे ऐकून सर्वांनाच लाज वाटेल. हैदराबाद पीडितेचे नाव पॉर्न साइटवर टॉप ट्रेंडमध्ये आहे.

जगभरातील टॉप 100 पोर्न वेबसाइट्समध्ये सहभागी असलेल्या एका साइटवर टॉप ट्रेंड असलेल्या सेक्शनमध्ये हैदराबाद पीडितेचे नाव सर्वात वर आहे. आता पर्यंत 1 मिलियन पेक्षा जास्त वेळा तिचे नाव या वेबसाइटवर सर्च करण्यात आले आहे. एवढेच नाही तर हे नाव या वेबसाइटवर यामुळे ट्रेंडमध्ये आहे. जसे गूगलवर काही जास्त सर्च झाले तर टॉप सर्च लिस्टमध्ये येते तसेच या साइटवर काही सर्च केल्यास ते टॉप ट्रेंडमध्ये दाखवले जाते. एकीकडे देश पीडित महिलेच्या बलात्कार आणि हत्येने घाबरला आहे तर दुसरीकडे अशा बाबी समोर येत आहे ही खूपच लाजीरवाणी बाब आहे. हा एक प्रकारचा आजार आहे ज्यावर काहीही इलाज नाही.

मिडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की आतापर्यंत 8 मिलियनपेक्षा जास्त वेळा या तरुणीचे नाव या वेबसाइटवर सर्च झाले आहे. वेबसाइटच्या टॉप ट्रेंड असलेल्या सेक्शनमध्ये या पीडित तरुणीचे नाव सर्वात वर येते. एकीकडे लोक आरोपींना शिक्षा ठोठवण्यात यावी यासाठी धरणं आंदोलन करतात. तर दुसरीकडे लोक या पीडितेचे नाव अशा ठिकाणी सर्च करत आहे ज्याची माहिती देणं देखील लाजीरवाणं वाटतं.

एवढंच नाही तर या पीडितेचे नाव वेबसाइटवर ट्रेंडमध्ये असल्याचे स्क्रिन शॉट सोशल मिडियावर फिरत आहे. हे पहिल्यांदाच झालेले नाही. जेव्हा काही लोक या प्रकाराचे शिकार झाले आहेत तेव्हा देखील असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. पहिल्यांदा देखील अशी प्रकरणं समोर आली जेव्हा पीडिताच्या नावाने लोक असे काही सर्च करत होते.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like