हैदराबाद एन्काऊंटर : आता पुन्हा कोणी असं करण्याचं ‘धाडस’ करणार नाही !

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी पोलिसांची शस्त्रे घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. यानंतर देशभरातून याबाबतच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनतेने या घटनेबाबत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांना वाटत होते की या अपराध्यांना लवकर शासन व्हावे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेदेखील पोलिसांची प्रशंसा केली. त्याचसोबत त्याने हैदराबाद सरकारचेही अभिनंदन केले. “हैदराबाद सरकार आणि पोलीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी साऱ्यांना दाखवून दिले की हे असेच व्हायला हवे होते. आता पुन्हा कोणी असं करण्याचं धाडस करणार नाही, असे ट्विट हरभजनने केले. त्याचसोबत त्याने भारत सुरक्षित बनवा (#makeitsafeindia) असा टॅगदेखील दिला आहे.

काय झाले होते नेमके त्यावेळी
आरोपींना त्याच ठिकाणी नेण्यात आलं , ज्या ठिकाणी या आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला होता. त्यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केला आणि पोलिसांवरच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २ पोलीस जखमी झाल्याचेही समजते आहे. त्यामुळेच पोलिसांना या आरोपींवर गोळीबार करावा लागला ज्यात चारही आरोपी ठार झाले. शुक्रवारी पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान ही घटना घडली. अशी अधिकृत माहिती शमसाबादचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिली.

आरोपीना तातडीने फाशीची शिक्षा होणे फरजेचे आहे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्रीणकडे केली होती. आरोपी पळून जाऊन पुन्हा असे कृत्य करू शकतात त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे.

आरोपींना ठार केल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, दहा दिवसांच्या आतमध्ये आरोपींना मारण्यात आले, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असे म्हणत त्यांनी तेलंगणा सरकार, पोलीस आणि सोबत उभ्या असलेल्या सर्व लोकांचे आभार मानले.

Visit : Policenama.com