हा तर कायद्याच्या रक्षकांचा समाजातील राक्षसांवर विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी पोलिसांची शस्त्रे घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. यानंतर देशभरातून याबाबतच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनतेने या घटनेबाबत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांना वाटत होते की या अपराध्यांना लवकर शासन व्हावे. त्यानंतर सर्वच स्तरातील हैद्राबादच्या पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने देखील पोलिसांच्या कृत्याचे समर्थन केले आहे.

आज सकाळी सकाळी मनाला सुखावणारी बातमी मिळाली. हैदराबादमध्ये झालेली चकमक म्हणजे कायद्याच्या रक्षकांनी समाजातील राक्षसांवर मिळवलेला विजय आहे. पोलीस विभागाला कोटी – कोटी प्रणाम. निर्णय घेण्याची पद्धत कोणतीही असो, पण जे झाले ते प्रशंसनीय आहे, असे ट्विट करत त्याने पोलिसांचे कौतुक केले.

आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा होणे फरजेचे आहे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्रीणकडे केली होती. आरोपी पळून जाऊन पुन्हा असे कृत्य करू शकतात त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे.

आरोपींना ठार केल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, दहा दिवसांच्या आतमध्ये आरोपींना मारण्यात आले, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असे म्हणत त्यांनी तेलंगणा सरकार, पोलीस आणि सोबत उभ्या असलेल्या सर्व लोकांचे आभार मानले.

Visit : Policenama.com