संतापजनक ! ‘त्यानं’ आपल्याच मित्राच्या अल्पवयीन मुलीला पाठवले ‘घाण’ आणि ‘अश्लील’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकानं आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हैद्राबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सदर व्यक्ती 40 वर्षांचा आहे. नुकतीच हैद्राबादमधील महिला डॉक्टरच्या गँग रेपची आणि हत्येची घटना समोर आली होती. देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच पोलिसांनी आता लैंगिक अत्याचारांना आळा घालण्याची मोहिमच जणू हाती घेतली आहे असं दिसत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इसम आणि मुलीचे वडिल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आरोपीनं कौटुंबिक समारंभादरम्यान सदर मुलीचा मोबाईल नंबर घेतला होता. काही दिवसांनी त्याला अश्लील फोटो पाठवले. आपल्या वडिलांच्या मित्रानं आपल्याला असे फोटो पाठवले हे पाहून त्या मुलीला धक्काच बसला. तिनं तातडीनं आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेत यासंदर्भात तक्रार दाखल केली.

प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अंतर्गत पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित मुलीचं समुपदेशन करून तिला घरी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान त्या इसमानं असं का केलं, त्याचा उद्देश नेमका काय होता हे मात्र अद्याप समजलं नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like