Hyderabad News | दुर्दैवी ! शेतकऱ्याने स्वत:च्या पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी जमा केलेले 2 लाख रुपये उंदरांनी कुरतडले

हैदराबाद : वृत्तसंस्था – देशातील शेतकऱ्यांना (Farmer) कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करावा लगतो. यामुळे शेतकरी हवालदील होतो. परंतु हैदराबादमधील (Hyderabad News) एका शेतकऱ्यावर उंदरांमुळे संकट कोसळलं आहे. हैदराबादमधील (Hyderabad News) या शेतकऱ्याने भाजी-पाला विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा केलेले दोन लाख रुपये उंदरांनी कुरतडले (2 lakh gnaw by rats). कुरतडलेल्या नोटा पासून शेतकरी मानसिकरित्या पूर्णपणे कोसळला आहे.

हैदराबादच्या महबुबाबाद मधील वेमुनूर या खेडेगावात रेडिया नाईक (Redia Naik) नावाचा शेतकरी राहतो. भाजी-पाला (vegetable) विकून घर चालणाऱ्या रेडिया नाईक यांनी स्वत:च्या सर्जरीसाठी (Surgery) पैसे जमा केले होते. घरातील कपाटात 2 लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. यात सर्व पाचशेच्या नोटांचा समावेश होता. नाईक यांनी आज पैसे ठेवलेली बॅग उघडून पाहिली असता त्यांना मोठा धक्का बसला. बॅगेतील सर्व नोटा उंदरानं कुरतडून टाकल्याचे दिसून आलं आणि ते पुरतेच खचले.

पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी जमवली होती रक्कम
नाईक हे आपल्या दुचाकीवरुन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी मोठ्या कष्टानं ही कमाई केली होती. तर काही रक्कम त्यांनी आपल्या नातेवाईकांकडून उधार घेतली होती. पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी नाईक यांनी ही रक्कम जमा केली होती. कुरतडलेल्या नोटा घेऊन ते बँकेत गेले. मात्र बँकेने कुरतडलेल्या नोटा घेण्यास नकार दिला.

 

शस्त्रक्रियेसाठी 4.5 लाखांचा खर्च

रेडिया नाईक यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यासाठी एका रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. यासाठीच ते दोन लाख रुपये जमा करत होते. महुबाबाबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. यासाठी त्यांना साडेचार लाखांचा खर्च सांगण्यात आला होता.

RBI कडे मागितली दाद
बँकांनी नोटा स्वीकारण्यास नकार देत आरबीआयकडे (RBI) जाण्याचा सल्ला नाईक यांना दिला.
त्यांनी हैदराबाद मधील आरबीआय बँकेकडे (RBI Bank) आपली व्यथा मांडली.
पण नोटा अर्ध्यापेक्षा अधिक कुरतडलेल्या असल्याने नियमानुसार त्यांना कुरतडलेल्या नोटांऐवजी नव्या नोटा देणं शक्य नसल्याचे आरबीआयनं म्हटलं.

Web Titel :- Hyderabad News | telangana rats nibble rs 2 lakh cash vegetable farmer kept his surgery

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक