ट्रेनमध्ये खिसे कापून झाला ‘श्रीमंत’, १५ वर्षांपासून जगतोय ‘आरामदायी’ आयुष्य

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये एक व्यक्ती ट्रेनमध्ये खिसे कापून १५ वर्षे आरामात आपले आयुष्य व्यतीत करत होता. रेल्वे पोलिस म्हणजेच जीआरपीने मंगळवारी या व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणेदारसिंग कुशवा यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांचे खिसे कापून भरपूर पैसे कमावले. तो हैदराबादमधील एका अपार्टमेंटमध्ये राहतो, ज्याचे भाडे दरमहा ३० हजार रुपये आहे. इतकेच नाही तर आरोपी शहरातील नामांकित आंतरराष्ट्रीय शाळेत आपल्या दोन्ही मुलांना शिकवतो आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणेदारसिंग कुशवाला चोरीच्या आरोपावरून काही काळ पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठवण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अजमल कसाब हा कैदीही तिथेच होता. नंतर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पॉकेटमारी सुरू केली. तो चोरीसाठी जास्त करून राखीव बोग्यांमध्ये चढत असे.

सिकंदराबादच्या जीआरपी अधीक्षक जीआर अनुराधा यांच्या म्हणण्यानुसार, कुशवा २००४ पासून पॉकेटमार आहे. आतापर्यंत त्याने ४०० चोरीच्या घटना घडवून आणल्या आहेत. तसेच २ कोटी रुपयांपर्यंतचे दागिने व रोख रक्कमही चोरून नेली. जीआरपीच्या म्हणण्यानुसार आरोपीही साट्यातही पैसे लावत असे. त्याच्याकडून जीआरपीकडून १३ लाखांची रोकड व ५४ लाख रुपयांची ६७ तोळे सोने जप्त केले. पोलिस त्याच्याकडे अधिक विचारपूस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/