पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

हैदराबाद : वृत्तसंस्था – फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियासारखी माध्यमे वापरणाऱ्यांची संख्या जगभरात कोट्यावधी आहे. आजकाल तरुणापासून ते वृद्धापर्य़ंत सर्वांना सोशल मीडियाने वेड लावले आहे. प्रत्येकजण आपली वैयक्तीक माहिती, कुटुंबाची माहिती किंवा कुटुंबातील व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. तरुण तरुणींमध्ये सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करण्यात येत असतात. मात्र या फोटोचा गैरवापर होण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार हैदराबाद येथे घडला असून एका तरुणाने सोशल मीडियाचा वापर करून तब्बल ३०० मुलींचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून त्यांना ब्लॅकमेल केले आहे. या प्रकरणामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

हैदराबाद सायबर पथकाने विनोद नावाच्या २५ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. तो मुळचा विशाखापट्टनमचा रहिवाशी असून त्याने सोशल मीडियाचा गैरवापर करत ३०० मुलींची फसवणूक केली आहे. तसेच त्याने त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे वृत्त ‘आज तक’ ने दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद हा एका मोबाईलच्या दुकानात काम करत होता. दुकानात काम करत असताना तो फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम या अॅपवरून तो मुलींचे फोटो डाऊनलोड करुन घेत होता. डाऊनलोड केलेले फोटो तो पॉर्न वेबसाईटवर अपलोड करून त्या मुलींना फोन करून तुमचा फोटो पॉर्न वेबसाईटवर पाहिल्याचे सांगत होता. तसेच मी सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याचे सांगून फोटो काढून टाकण्यासाठी मुलींकडे पैशांची मागणी करत होता. एका मुलीने तर सलग चार महिने दहा हजार रुपये दिले. त्यानंतर ही त्याने पैशांचा तगादा लावल्याने तिला संशय आला. पैसे देण्यास नकार देऊन पीडित मुलीने सायबर सेलकडे याची तक्रार दिली.

सायबर सेलच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून आरोपी विनोदला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करण्यासाठी तो नवीन सीम कार्डचा वापर करत होता. त्या सीम कार्डद्वारे फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवरून मुलींचे फोटो आणि नंबर मिळवत होता. तसेच तो फोटो त्याच मुलीचा आहे का याची खात्री करण्यासाठी तो मुलीला फोन करायचा. त्यानंतर मुलींचे फोटो पॉर्न वेबसाईटवर टाकून ब्लॅकमेल करत असल्याचे त्याने चौकशी दरम्यान सांगितले. तपासामध्ये तो मुलींना सेक्सचॅट करण्यासाठी धमकावत असल्याचेही समोर आले आहे. या विचित्र प्रकरणामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा

पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी

…तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल

‘पबजी’च्या वेडापायी अभियंत्याची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

Loading...
You might also like