माजी DGP च्या घरातून 1.5 लाख रुपयांची दुर्मिळ वनस्पतीची ‘चोरी’, 4 दिवसांत पोलिसांनी चोराला शोधले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये (hyderabad) एका चोरट्याचे धाडस इतके वाढले की त्याने एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरीच चोरी केली. चोराने चोरी देखील केली तर ती एका कुंडीत लावलेल्या रोपाची. मात्र, हैदराबाद (hyderabad) पोलिसांनी चार दिवसातच चोरट्याला शोधून काढले.

वास्तविक घडले असे की हैदराबादमधील (hyderabad) माजी पोलीस महासंचालक व्ही.आप्पा राव (Former Director General of Police V. Appa Rao)
यांच्या घराच्या दारावर एक दुर्मिळ प्रकारची वनस्पती (बॉनसाय प्लांट) लावली होती. या वनस्पतीची किंमत सुमारे दीड लाख आहे. ती 15 वर्ष जुनी आहे. येता-जाता चोरट्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घराबाहेर ही वनस्पती पाहिली आणि चोरीची योजना आखली.

आप्पा राव (Former Director General of Police V. Appa Rao)यांच्या घरी ही दुर्मीळ बॉनसाय वनस्पती (Bonsai plant)  15 वर्षांपासून लावलेली होती, परंतु ही वनस्पती सोमवारी गायब झाली. जेव्हा त्यांचा माळी त्या झाडाला पाणी देण्यासाठी गेला तेव्हा त्याने पाहिले की ती वनस्पती तेथे नव्हती. यानंतर राव यांच्या पत्नी श्रीदेवी ज्युबली हिल्स पोलिसांकडे (Jubilee Hills Police) पोहोचल्या आणि तक्रार नोंदविली. विशेष म्हणजे या माजी अधिकाऱ्यांच्या घरात दोन सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras)  बसविण्यात आले आहेत, परंतु चोरीच्या वेळी दोघेही काम करत नव्हते. मात्र, पोलीस पथकाने रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीच्या (CCTV cameras) सहाय्याने चोरट्याला पकडले.

हैदराबाद (hyderabad) हे भारतातील सर्वोच्च देखरेखीच्या शहरांपैकी एक आहे. शहरात प्रति चौरस किलोमीटरवर 339 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) आहेत. या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पोलिसांना आढळले की ही वनस्पती अधिकाऱ्याच्या घराच्या गेटजवळच्या भांड्यात लावण्यात आली होती, ज्याची दोन दुचाकीस्वारांनी चोरी केली आहे. शुक्रवारी तक्रार दिल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी एका चोरट्याला पकडले आणि त्याच्याकडून वनस्पतीही जप्त केली.

गोलपुडी प्रसन्नजनयुलु (वय 21) आणि अभिषेक अशी या दोघांची नावे आहेत. अभिषेक अद्याप फरार आहे. आरोपीने त्या भागात फिरत असताना माजी अधिकाऱ्यांच्या घराबाहेर असलेली ती वनस्पती पाहिली आणि त्यास चोरी करण्याचे ठरविले. 10 जानेवारीला तो दुसऱ्या एका आरोपीसोबत दुचाकीवर आला आणि त्या दुर्मिळ वनस्पतीला (Rare plant) उचलून फरार झाला. आरोपीला या वनस्पतीला विकायचे होते. परंतु पोलिसांनी त्याला रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या (CCTV cameras) साहाय्याने ओळखले आणि चोरीच्या चार दिवसानंतर त्याला वनस्पतीच्या भांड्यासह अटक केली.