काय सांगता ! होय, पुजार्‍यास लागलं ‘PUBG’ चं ‘व्यसन’, हौस पुर्ण करण्यासाठी चोरल्या सायकली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मोबाइल गेम PUBG ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून या PUBG गेमने शालेय विद्यार्थी आणि तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की मंदिराचा पुजारीदेखील या गेमच्या प्रभावापासून सुटू शकलेला नाही. हैदराबाद पोलिसांनी मंदिराच्या अशाच एका पुजार्‍याला अटक केली आहे. या पुजारीवर महागड्या स्पोर्ट्स सायकल चोरी केल्याचा आरोप आहे.

१९ वर्षीय पुजाऱ्यास या गेमची लत लागली आहे. एवढंच नाही तर तो आपल्या हौसमौज पूर्ण करण्यासाठी सायकल चोरायचा. नंदुला सिद्धार्थ शर्मा ने वेदांचा अभ्यास केला असून जवळच्याच मंदिरात तो पुजारी आहे.

सिद्धार्थ त्याच्या आईबरोबर मौला अलीच्या मंगापुरम कॉलनीत राहतो. तो गेल्या काही काळापासून जवळच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करत होता, पण अलीकडच्या काळात त्याला पबजी मोबाईल गेमची सवय लागली. तो त्याची हौसमौज पूर्ण करण्यासाठी नेहमी आईशी भांडत असे. जेव्हा त्याला घरातून पैसे मिळू शकले नाहीत तेव्हा त्याने शेजार्‍यांच्या सायकली चोरण्यास सुरवात केली. त्याला जवळपास उभी असलेली जी सायकल दिसायची ती चोरी करून आपली हौसमौज पूर्ण करण्यासाठी विक्री करायचा.

या तरुण असलेल्या पुजारीने आत्तापर्यंत जवळपास ३१ सायकली चोरी केल्या आहेत. परंतु गुरुवारी त्याची चोरी ही जगजाहीर झाली. त्यामुळे मलकाजगिरी पोलीस स्टेशन स्थित हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी सिद्धार्थ कडून जवळपास १७ सायकली जप्त केल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/