हैद्राबाद : सॉफ्टवेअर इंजिनियरसह संपुर्ण कुटुंबाने केली आत्महत्या, 4 जणांचा मृत्यू

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाइन – हैद्राबादमध्ये एक अतिशय दुखद घटना घडली आहे. येथे किटकनाशक औषध पिऊन कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केली आहे. ही दुखद घटना हैद्राबादच्या राचाकोंडा कमिश्नर झोनअंतर्गत येणार्‍या एलबी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हस्तिनापुरम येथे घडली आहे.

एलबी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या हस्तिनापुरम येथे एका कुटुंबातील 4 लोकांनी किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणार्‍या मृतांची नावे प्रदीप (33) आणि स्वाती (29) अशी आहे. या दाम्पत्याशिवाय यांची 2 मुले कल्याण (5) आणि जय कृष्णा (2) यांनाही विष देऊन संपवण्यात आले आहे.

कुटुंब प्रमुख प्रदीप एका बड्या मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करत होते. ते आर्थिक विंवचनेत असल्याचे बोलले जात आहे.

शेजार्‍यांनी दिली माहिती
प्रथम प्रदीपने रविवारी आपली पत्नी आणि मुलांना विष दिले आणि नंतर त्याने किटकनाशक पिऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घरात कोणतीही हालचाल होत नसल्याने शेजार्‍यांना संशय आला. यानंतर शेजार्‍यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सध्या पोलिसांनी या प्रकरणाची रितसर नोंद केली असून तपास सुरू केला आहे. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.