थरारक ! रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये पाय अडकलेल्या प्रवाशाला पळत जाऊन पोलिसानं वाचवलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबादमधील तेलंगणा रेल्वे स्थानकात एक अपघात झाला ज्याने सर्वांना चकित केले. असे म्हणतात की कधीही चालणार्‍या ट्रेनमध्ये चढता कामा नये आणि त्यावेळी ट्रेनपासून दूर उभे रहावे. अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. एक माणूस चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा पाय घसरला आणि त्याचा पाय प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. आणि मग सुरु झाला त्याचा मृत्यूच्या दिशेने प्रवास मात्र सुदैवाने तो वाचला हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील CCTV मध्ये कैद झाला आहे.

व्हिडीओमध्ये पाहता येईल की प्रवाशांचा पाय चालू ट्रेनमधील प्लॅटफॉर्ममध्ये अडकला आहे. त्याला वाचवण्यासाठी रेल्वे पोलिसाने ट्रेनच्या मागे पळ काढला आणि त्याला वाचवले.

नामपल्ली रेल्वे स्थानकात एक प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर जास्त लोक नव्हते. त्याचा पाय घसरला, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधे तो अडकला. रेल्वे पोलिसाने ते पाहिले आणि त्याला पळत जाऊन बाहेर ओढलं सुदैवाने त्या प्रवाशाचे प्राण वाचले. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –