… म्हणून आरोपींचं एन्काऊंटर केलं, हैदराबाद पोलिसांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातून हळहळ व्यक्त करणारी एक घटना हैद्राबादमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. एका वेटणरी डॉक्टरवर चार नराधमांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. आज सकाळी पहाटे तपास करत असताना चारही आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी आरोपींनी पोलिसांजवळची हत्यारे देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असे स्पष्टीकरण हैद्राबाद पोलिसांकडून देण्यात आले आहे.

नेमके घटनेवेळी काय झाले हे समजून घेण्यासाठी पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांचीच शस्त्रे घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी स्वरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार केला. यामध्ये चारही आरोपी मारले गेले. अशी माहिती पोलीस आयुक्त शमशाबाद प्रकाश रेड्डी यांनी दिली.

तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबादमध्ये बलात्कार करून पीडितेला जिवंत जाळल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशातून याबाबत रोष व्यक्त केला जात होता. सोशल मीडियावरही याबाबतच्या अनेक प्रतिक्रिया यायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like