हैदराबादच्या एन्काऊंटरबद्दल देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायला हवा आणि तो कायद्यानं मिळाला पाहिजे, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ एन्काऊंटरविषयी मला मीडियाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आता माझ्याजवळ त्यासंदर्भातली जास्त माहिती नाही. त्यामुळे मी अधिक बोलणार नाही. लोकांमध्ये तीव्र भावना पाहायला मिळते. बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं लोकांचं मत आहे. बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायला हवा आणि तो कायद्यानं मिळाला पाहिजे. ‘

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. या घटनेविषयी अनेकांनी या एन्काउंटरप्रकरणी पोलिसांचे अभिनंदन केले असून काहींनी या एन्काउंटरबद्दल संशय व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com

You might also like