हैदराबाद रेप प्रकरण : आरोपींचे एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. निलम गोऱ्हेंची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंट करण्यात आला. त्यानंतर विविध स्तरावरुन या घटनेवर प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केले त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरु केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आले असते.

शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना असे एन्काऊंटर होते तेव्हा पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, त्यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करण्यात यावी. सीआयडी अथवा सीबीआयकडून ही चौकशी व्हावी. अशा मार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही, आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनेवर पडदा पडावा म्हणून पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते खरेच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, परंतू या घटनेची चौकशी व्हायला हवी.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की, हैदराबाद प्रकरणात पोलिसांनी आरोपींचा खात्मा केला ते योग्यच आहे, शस्त्र हिरावून पळण्याचे धाडस करणाऱ्यांचा खात्मा झाला. या प्रकरणात सुनावणी सुरु होती. न्यायिक प्रक्रिया सुरु होती.

काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारे हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्या ठिकाणी आरोपींनी हे दुष्कर्म केले होते तेथेच आरोपांचा खात्मा करण्यात आला. पोलीस तपासासाठी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी घटनेचे रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांकडून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू त्यात अपयश आले. अखेर पोलिसांकडून गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like