हैदराबाद रेप आणि एन्काऊंटर केस : ‘त्या’ दोघा नराधमांनी यापुर्वी 9 बलात्कार केले, तपासात धक्कादायक ‘उघड’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तेलंगाणा येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या चारही जणांचे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आले. यानंतर देशभरातून पोलिसांचे कौतुक करण्यात आले. तसेच काही लोकांनी विरोध करत झालेल्या प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी केली. मात्र आता या प्रकरणाविषयी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

चौकशीनंतर उघड झाले की एन्काऊंटर झालेल्या ४ आरोपींपैकी २ आरोपींनी यापूर्वी ही ९ महिलांवर बलात्कार करून त्यांना अशाचप्रकारे जाळून मारलं असल्याचं कबुली दिली होती. त्यानंतर या आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारलं. सध्या साइबराबाद पोलीस आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्नाटकात तपास करत आहेत. यामधील काही घटना या तेलंगाणा आणि कर्नाटक सीमाभागात घडल्या असल्याचे समोर आले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना कस्टडीमध्ये घेतल्यानंतर आम्हाला तेलंगणा आणि कर्नाटक हायवेवर महिलांसोबत होणारे बलात्कार आणि जाळून मारणे अशा जवळपास १५ घटनांच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती लागले. या १५ घटनांपैकी ९ घटनांमध्ये या चार आरोपींपैकी दोन आरोपींचा समावेश आहे. आणि हे त्यांनी कबूल केलं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तपासासाठी घटनास्थळी पाठविण्यात आल्या होत्या.

या चार आरोपींपैकी दोघांनी कबुली दिली त्यानुसार तेलंगणा पोलिसांचा सांगितले की, आरिफचा सहा गुन्ह्यामध्ये समावेश आहे तर चेन्नाकेशवुलू याचा तीन महिलांचा बलात्कार आणि हत्या प्रकरणात समावेश आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणासह संगा रेड्डी, रंगा रेड्डी आणि महबूबनगर हायवे, कर्नाटकातील सीमावर्ती भागातील शहरात या घटना घडल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/