बलात्काराच्या आरोपींचं ‘एन्काऊंटर’, IPS वी सी सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातून हळहळ व्यक्त करणारी एक घटना हैद्राबादमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. एका वेटणरी डॉक्टरवर चार नराधमांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. यानंतर चारही आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. आज सकाळी पहाटे तपास करत असताना चारही आरोपीना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून ज्याण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी या चारही आरोपींचा एन्काउंटर केला. सायबराबादचे पोलीस आयुक्त वी सी सज्जनार यांच्या नेतृत्वात हैद्राबाद पोलिसांनी हा एन्काउंटर केला आहे.

काय झाले नेमके त्या वेळी
पोलीस अधिक तपासा साठी चारही आरोपीना घटनास्थळी घेऊन गेले होते. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जाऊ लागले अखेर पोलिसांनी गोळीबार केला त्यात चारही आरोपींचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकारामध्ये सज्जनार यांनी अतिशय गतिमान पद्दतीने कामगिरी केली. सज्जनार हे १९६६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच स्पेशल इंटेलिजन्स ब्रँचच्या आयजीपदी आणि त्याच ब्रँचच्या डेप्युटी आयजीपदी त्यांनी काम केले आहे.

सायबराबादमध्ये आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिला आणि मुलांच्या संरक्षणाबाबत विशेष प्राधान्य देणे हेच माझे काम असल्याचे मत सज्जनार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात यासंदर्भातील फोटो व्हायरल होत असून तेलंगणा पोलिसांवर याबाबत कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून याबाबत लवकर निर्णय देण्याचे आदेश दिले होते. मात्र आज झालेल्या घटनेमुळे अवघ्या आठ दिवसातच या पीडितेला न्याय मिळाल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

बलात्करांच्या या घटनेनंतर अवघ्या देशातून याबाबत रोष व्यक्त केला जात होता. पीडितेच्या पोस्टमार्टम मध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. पेशाने वेटणरी डॉक्टर असलेल्या पीडितेवर ४ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे अहवालात समोर आले होते. बुधवारी रात्री ९.३० वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले होते . यावेळी तिला जवळजवळ ७ तास बांधून ठेवण्यात आले होते. चारही आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर टॉर्चर करण्यात आल्याचे देखील अहवालात म्हंटले होते.

या घटनेनंतर संपूर्ण देशातून प्रत्यक्षपणे किंवा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात होता.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like