हैदराबादेतील सामुहिक बलात्काराप्रकरणी ‘भाईजान’ सलमान खाननं केलं मोठं विधान, म्हणाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे आणि हत्येमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला. सर्वांकडून या प्रकरणी शोक व्यक्त केला जात आहे. आता संतप्त लोकांकडून या आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

बॉलिवूडमध्ये देखील यामुळे संताप आहे. अक्षय कुमार, शबाना आजमी आणि यामी गौतम नंतर सलमान खान याने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलमान म्हणाला की सर्वांना सोबत मिळून हे सर्व थांबवण्यासाठी काहीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे.

सलमानने ट्विट केली की, माणसाच्या रुपात हैवान. निर्भया आणि आज या महिला डॉक्टर बरोबरच इतर महिलांबरोबर झालेली ही प्रकरण तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. सर्वांनी मिळून पाऊल उचलले पाहिजे. यानंतर आणखी एखाद्या महिलेबरोबर हे सर्व व्हावं याआधीच हे सर्व थांबवलं पाहिजे. आपण सर्वांना या दुष्कर्माविरोधात आवाज उठवला पाहिजे.

सलमान म्हणाला की बेटी बचाओ, बेटी पढाओ फक्त एक कँपेनपर्यंत मर्यादित नाही राहिले पाहिजे. आता वेळ आहे अशा राक्षसांच्या विरोधात मिळून उभे राहणे. देव, या महिला डॉक्टरच्या आत्मास शांति देवो. सलमान शिवाय विवेक ओबेरॉयने या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणावर एकजूट होऊन हे संपवण्यावर त्याने भर दिला.

काय आहे प्रकरणं –
वेटरनरी डॉक्टर असलेली महिला बुधवारी कोल्लुरु स्थित पशु चिकित्सालयात गेली होती. या दरम्यान तिची गाडी पंक्चर झाली. त्यानंतर तिने ही माहिती फोन करुन आल्या बहिणीला सांगितली. तिने तिच्या बहिणीला देखील सांगितले की तिला भीती वाटत आहे.

तिने सांगितले की काही लोक तिला मदत करत आहे थोड्या वेळाने कॉल करेल. त्यानंतर तिचा फोन बंद लागला. नातेवाईकांनी यानंतर शादनगर टोल प्लाजाच्या परिसरात तिचा शोध घेतला परंतू ती मिळाली नाही. सकाळी शादनगर अंडरपासच्या जवळ तिचा जळालेला मृतदेह मिळाला.