हैदराबाद रेप केस : पीडितेच्या आई-वडील आणि बहिणीने सांगितले ‘त्या’ रात्रीचा घटनाक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेबरोबर बलात्कार आणि हत्येची घटना घडली. ज्यामुळे संपूर्ण देशात रोषाचे वातावरण आहे. संसदेत देखील या मुद्द्यावर बराच गोंधळ झाला. पीडित महिलेच्या वडीलांनी या प्रकरणानंतर सांगितले की गुन्हा करणाऱ्याचे वय खूप कमी आहे परंतू त्यांनी जे काही केले ते खूप मोठे केले. ते गुन्हेगार आहेत. त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. पीडितेच्या आईने सांगितले की मुलीला ज्या प्रकारे जाळण्यात आले त्याच प्रकारे ते गुन्हेगारांना जाळले पाहिजे. या गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.

पोलीस तपासत आहेत सीसीटीव्ही फुटेज –
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या मुलीचा फोन आला होता तेव्हा ते घरी नव्हते. ते कोल्हापूरला होते. त्यांनी आरोप केला की पोलीस या प्रकरणी निष्काळजीपणे काम करत आहेत. पोलीस सुरुवातीला घटनास्थळी गेले नाहीत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत राहिले. या फुटेजमध्ये पीडित महिला दिसली नाही, उलट पोलिसांनी त्यांच्या मुलीवर प्रश्न उपस्थित केला.

पीडितेच्या वडीलांचे म्हणणे आहे की दोषींना लवकरात लवकर शिक्षा सुनावण्यात यावी. पहिल्यांदा निर्भयाच्या आरोपींना सोडले आणि आता ही घटना घडली. दोषींना कठोर शिक्षा सुनावली गेली पाहिजे.

पीडितेच्या बहिणीचे म्हणणे आहे की ती या घटनेनंतर घराबाहेर देखील पडली नाही. पोलिसांची कोणतीही मदत मिळाली नाही. जर योग्य वेळी तिला मदत मिळाली असती तर ती आज जिवंत असती. बहिणीने देखील मागणी केली की दोषींना लवकरात लवकर शिक्षा सुनावण्यात यावी.

घटनास्थळापासून घर होतं 2 किलोमीटर दूर –
पीडितेच्या बहिणीने सांगितले की ही घटना जेथे घडली तेथून घर फक्त 2 किलोमीटर दूर होतं. तिचा जेव्हा कॉल आला तेव्हा फक्त 6 मिनिट तिच्याशी बोलणं झालं. ती म्हणाली की तिच्या मोबाइलमध्ये रेकॉर्डची सुविधा आहे आणि बहिणीचा शेवटचा कॉल तिच्याकडे रेकॉर्ड आहे ज्यात ती म्हणत होती की तिला भीती वाटत आहे.

बहिणीने सांगितले की ती तिच्यापेक्षा दीड वर्षांनी लहान आहे, परंतू ती सर्वांची खूप काळजी घेत असतं. एवढेच काय जेवन देखील भरुन देत होती. अनेकदा जेवायला घालायची. ती सर्वांची मदत करायची.

तिने तिचे स्वप्न पूर्ण केले –
वडिलांनी सांगितले की ती खूप कष्टाळू होती. तिने तिची सर्व स्वप्न पूर्ण केली. 14-14 तास ती अभ्यास करायची. 5 वर्ष डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. सर्विस कमीशनची परिक्षा देखील पास केली होती आणि 3 वर्ष नोकरी केली होती.

वडीलांनी आपल्या मुलीबद्दल सांगितले की आता तिच्या लग्नाची तयारी सुरु होती आणि 2-3 महिन्यात तिचे लग्न करण्याचे नियोजन होते. तसेच ती पीजी करण्याच्या तयारीत होती, परंतू ती लग्नानंतर पीजी करणार होती. मुलीची इच्छा पूर्ण करण्याची आमचे प्रयत्न होते.

मुलांनी देखील संस्कार दिले पाहिजे – वडील
पीडितेच्या वडीलांनी सांगितले की मुलांवर देखील संस्कार केले गेले पाहिजे. घरातून चांगले संस्कार दिले गेल्यास अशा घटनांवर रोख येईल. मुलींना देखील या बाबात जागरुक केले गेले पाहिजे. ते म्हणाले की पोलिसांनी देखील मुलांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करावी. पोलिसांनी जागरुकता निर्माण करण्याबाबत कार्यक्रम राबवावे. तसेच नंबर डायल करण्याबाबात जागरुकता निर्माण करावी.

पीडितेच्या वडीलांनी सांगितले की 100 नंबर डायल करण्यावर टीका केली ते म्हणाले की यात बराच वेळ लागतो. फोन केल्यावर 1 नंबर डायल करा. 2 नंबर डायल करा. यात बराच वेळ लागतो. यात बराच वेळ लागतो. वडील म्हणाले की शेवट्या कॉल दरम्यान त्यांची मुलीने सांगितले की फळ कापून ठेवा. तिला फळ खूप आवडायची.

Visit : policenama.com