लग्नानंतर पत्नीचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं आलं समोर, पठ्ठ्यानं 18 महिलांची केली हत्या, हैदराबादमध्ये प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या 24 वर्षात तब्बल 18 महिलांची हत्या करणा-या एका 45 वर्षीय सीरिअल किलरला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. महिलांच्या हत्येशिवाय इतर अनेक गुन्ह्यात आरोपीचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या अटकेनंतर हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नी सोडून गेल्याने महिलांबद्दल मनात द्वेष निर्माण झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी दोन महिलांच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक केल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीचा तब्बल 21 गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. यात 16 हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्हे आणि पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. दि. 1 जानेवारी रोजी एका व्यक्तीने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासा दरम्यान 4 जानेवारीला रेल्वे ट्रॅकवर महिलेचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान पीडिता आणि आरोपी एकत्र रिक्षातून प्रवास करत असल्याचे दिसले होते. आरोपी महिलेला एका निर्जनस्थळी घेऊन गेला आणि मद्यप्राशन करत हत्या केली होती.

वयाच्या 21 व्या वर्षीय आरोपीचे लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याच्या मनात महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला होता असे पोलिसांनी सांगितले आहे. शरीरसुखाच्या बहाण्याने अविवाहित महिलांना तो आपल्या जाळ्यात ओढत असे. एकत्रित मद्यप्राशन करून त्या महिलेची हत्या करायचा आणि नंतर त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढत असत. आरोपीने 2003 ते 2019 दरम्यान एकूण 16 हत्या केल्या. 2009 मधील हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षादेखील झाली होती. शिक्षा भोगत असतानाच त्याने जेलमधून पळ काढला होता. यादरम्यान त्याने पाच हत्या केल्या. 2013 मध्ये त्याला पुन्हा अटक केली होती. 2018 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता.