शिक्षकी पेशाला काळीमा ! चौथीतील 11 मुलींवर बलात्कार, आरोपी शिक्षक ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणाच्या वानापार्थीमधील एका शाळेत विद्यार्थींनीसोबत एक धक्कादायक घटना घडली. शिक्षकी पेशाला या घटनेने काळीमा फासला गेला. एका खासगी शाळेतील शिक्षकाने 11 लहान मुलींवर बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी या आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील पीडित विद्यार्थींनी 4 थीच्या विद्यार्थींनी आहेत. यातील काहींचा बलात्कार तर शाळेच्या परिसरात केला गेला आहे.

पोलिसांनी माहिती दिली की आरोपी 26 वर्षांचा आहे. 10 वर्षाच्या एका मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर आरोपीला आयपीसी कलम 376 अंतर्गत पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की पीडित मुलींपैकी काहींचा बलात्कार शाळेच्या परिसरात झालेला आहे. तर अनेकींसोबत अनेकदा लैंगिक छळ झालेला आहे. काही मुलींचा वर्ग सुरु असताना लैंगिक छळ केला गेला आहे.

डीएसपी किरण कुमार यांनी सांगितले की, हा लाजिरवाणा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा दोन मुलींमधील एका मुलीने आपल्या पालकांना ब्लिडिंग होत असल्याची तक्रार केली. चौकशीनंतर मुलींनी शिक्षकांकडून करण्यात आलेल्या छळाची माहिती दिली. या मुलींनी लैंगिक छळ झालेल्या आणखी एका मुलीची माहिती आपल्या पालकांना दिली.