धक्कादायक ! महिला डॉक्टरचा खून करून मृतदेह जाळला, बलात्काराच्या संशयाने प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबादमध्ये प्रियांका रेड्डी नावाच्या तरुणीला जाळून मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिसायला अगदी सुंदर असलेल्या प्रियांका रेड्डीची झालेली हालत पाहून तिच्या घरच्यांना धक्का बसला आहे.

प्रियांकाची स्कुटर शानदार टोलनाक्याजवळ पंचर झाली होती यावेळी तिने आपल्या बहिणीला फोन केला आणि मला या ठिकाणी भीती वाटत असल्याचे सांगितले आणि फोन कट झाला. यानंतर थेट प्रियांकाचा मृतदेह सापडल्याने मधल्या काळात तिच्यासोबत नेमके काय झाले याचे उत्तर अजूनही पोलिसांना सापडलेले नाही.

प्रियांकाचा फोन अचानक कट झाल्याने घाबरलेल्या बहिणीने याबाबत घरी सांगितले आणि घरच्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमाधे धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरु केला असता शानदार टोलनाक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सबवेमधे तिचा जळालेला मृतदेह सापडला. गळ्यातील लॉकेटवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटू शकली.

या खुनाचे गूढ उकळण्यासाठी पोलिसांनी आसपास असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज पहायला सुरुवात केली आहे. दहा पथके नेमून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसेच श्वानपथकाच्या मदतीने देखील अधिक तपास केला जात आहे.

प्रियांका ही पेशाने पशु वैद्यकीय क्षेत्रात होती. कोल्लूर येथील जनावरांच्या दवाखान्यात जाण्यासाठी ती आपल्या घरून निघाली होती. टोलनाक्याजवळ आल्यावर तिने गाडी तेथिचे लावली आणि टॅक्सी करून कामावर गेली मात्र कामावरून येताना स्कुटर पंचर असल्याचे तिच्या लक्षात आले तेव्हा तिने बहिणीला फोन करून याबाबत सांगितले तेव्हा बहिणीने तिला टॅक्सी करून घरी ये असे सुचवले. मात्र प्रियंकाने काही लोक माजी मदत करत आहेत असे सांगितले आणि फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन बंद पडला.

प्रियांकाच्या या धक्कादायक मृत्यू नंतर ट्विटरवर #RippriyankaReddy हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंडींमध्ये आला असून या घटनेबाबत अनेकांकडून खेद व्यक्त केला जात आहे.

भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

अभिनेत्री पायल रोहतगीने याला हिंदू मुसलमान वळण देत मुस्लिम परिसरात हिंदू मुलीची हत्या झाल्याने माध्यमांनी ही बातमी दाखवून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे

https://twitter.com/SwamiGeetika/status/1200221809611689984

Visit : Policenama.com