धक्कादायक ! लग्नानंतर अवघ्या 11 दिवसात सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीने संपवलं स्वतःला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका तरुणीने लग्नानंतर 11 दिवसात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबादच्या सनातननगरमध्ये राहणाऱ्या पूर्णिमाने आपल्या घरच्यांच्या विरोधात जाणून प्रेमविवाह केला होता. मात्र काही दिवसातच राहत्या घरी गळफास घेतल्याने यासाठी तिच्या आई वडिलांनी नवऱ्याला जबाबदार धरले आहे. पूर्णिमा आणि कार्तिकचे 22 नोव्हेंबरलाच लग्न झाले होते.

आतमहत्पूर्वी पूर्णिमाने लिहिलेली एक चिट्ठी सापडली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या आईला वडिलांची काळजी घेण्यास सांगितले आहे तसेच आई वडिलांपासून लांब आल्याने वाईट वाटत असल्याचे देखील तीने सांगितले. मात्र आत्महत्या करण्याचे नेमके कारण या चिठ्ठीमधून स्पष्ट होत नसल्याचे समजते.

सोमवारी रात्री कार्तिकचा वाढदिवस साजर केला. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु असल्यामुळे दोघेही मंगळवारी सकाळी उशिरा उठले. त्या दोघांमध्ये कोणत्या तरी विषयावरून वाद झाला म्हणून कार्तिक बेडरुमध्ये तर पूर्णिमा हॉलमध्ये झोपली होती.

कार्तिक ज्यावेळी हॉलमध्ये आला त्यावेळी त्याने पत्नीला फॅनला लटकलेले पाहीले. त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना बोलावले. विशेष म्हणजे मुलीच्या आई वडिलांनी या घटनेसाठी पूर्णिमाच्या नवऱ्याला जबाबदार धरले आहे.

Loading...
You might also like