पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hypersomnia Symptoms | अनेकदा तुम्हाला जाणवले असेल की रात्रभर झोपूनही कामाच्या ठिकाणी झोप येते. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे काही कारण आहे किंवा ही एक सामान्य समस्या आहे का? हा एक आजार असून त्याचे नाव हायपरसोमनिया (Hypersomnia Symptoms) आहे. यामुळे त्रस्त लोकांना पुन्हा पुन्हा झोप येते. अशावेळी ते चहा-कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. त्यापेक्षा काही सवयी बदलायला हव्यात. ज्यामुळे ही समस्या संपुष्टात येऊ शकते. जसे तुम्ही झोपण्याची सवय बदलली पाहिजे. याशिवाय सकस आहाराचे सेवन करावे.
वारंवार झोप येण्याचे कारण काय?
वारंवार झोप येण्याच्या समस्येला हायपरसोमनिया (Hypersomnia) म्हणतात. या आजाराने ग्रस्त असलेल्यांना रात्री झोपल्यानंतरही दिवसा झोप येते. त्यामुळे त्यांची कामेही होत नाहीत. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे जास्त दारू पिणे किंवा टेन्शन घेणे. झोप टाळण्यासाठी लोक चहा-कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. त्यामुळे आणखी समस्या वाढतात. यासाठी कोणते उपाय करावे जाणून घेवूया.
१. झोपण्याच्या सवयीमध्ये बदल करा
जर निरोगी राहायचे असेल तर दररोज ७ ते ८ तास झोपा. याशिवाय झोपेचा पॅटर्नही एकसारखा ठेवा. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यासारख्या वस्तू दूर ठेवा.
२. हेल्दी फूड खा
रोज हेल्दी फूड खाल्ले तर एनर्जी लेव्हल चांगली राहील. यामुळे प्रोटीन, व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेट्स पुरेशा प्रमाणात मिळेल. याशिवाय रात्रीच्या वेळी अशा गोष्टी खाऊ नका, ज्यामुळे झोप येण्यास त्रास होतो. (Hypersomnia Symptoms)
३. पुरेसे पाणी प्या
हिवाळ्यात पुरेसे पाणी प्यायले जात नाही. यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. यामुळे एनर्जी लेव्हल कमी होते आणि थकवा जाणवतो. शरीरात सुस्ती राहते.
४. दररोज व्यायाम करा
व्यायामाने रक्ताभिसरण चांगले होते. तसेच शरीर फिट राहते आणि तणावही दूर होतो. सकाळी व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप लागते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Hypersomnia Symptoms | hypersomnia symptoms causes treatment get rid of these diseases
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BBM4 | बिग बॉस मराठीला 4 मिळाले टॉप 5 स्पर्धक; मिड वीकला ‘हा’ खेळाडू …
Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया
Pune Police News | सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील