आणखी वाढणार क्षेपणास्त्रांची गती, DRDO ने हायपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची केली यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आज स्वदेशी विकसित स्क्रॅमजेट प्रोपल्शन सिस्टमचा वापर करून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोनेटर वाहनाची यशस्वी चाचणी केली. स्वतः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या यशानंतर पुढील टप्प्यातील प्रगती सुरू झाली आहे. या यशाबद्दल मी डीआरडीओचे आभार मानू इच्छितो, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचे व्हिजन पुढे केले. मी या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांशी बोललो आणि त्यांच्या या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारताला त्यांच्यावर अभिमान आहे.

हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्ट्रेटर वाहन

आज हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्ट्रेटर वाहनाची यशस्वी चाचणी केली. यापूर्वी जून 2019 मध्ये प्रथम त्याची चाचणी घेण्यात आली. याचा वापर हायपरसनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनविण्यासाठी व अत्यंत कमी किंमतीवर उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी केला जाईल. हे हायपरसोनिक आणि लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचे वाहन म्हणूनही वापरले जाईल.

हायपरसॉनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहन हाइपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यासाठी देशातील महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या क्लबमध्ये भारत सामील झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत चौथा देश आहे.