Hypertension : हाय ब्लड प्रेशरने वाढवल्या लोकांच्या अडचणी, धोका कमी करतील ‘हे’ 5 ब्रेकफास्ट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशर एक सामान्य समस्या आहे. बहुतांश लोक यासाठी औषधे घेतात, परंतु जीवनशैली आणि डाएटमध्ये बदल करून सुद्धा यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. दिवसाची सुरुवात तुम्ही काही अशा ब्रेकफास्टसह करा जो ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवेल. हायपरटेंशनच्या रूग्णांसाठी बेस्ट ब्रेकफास्ट कोणता ते जाणून घेवूयात…

हे आहेत ते ब्रेकफास्ट
1 ओट्स –
सकाळी ओट्सचा नाश्ता करा. यातील फायबर ब्लड प्रेशरसाठी चांगले असते. तसेच सोडियम खुप कमी असते. जे अशा रूग्णांसाठी घातक आहे.

2 फळे आणि दही –
हाय ब्लड प्रेशर वाल्यांनी नियमित दही सेवन करावे. अनेक अभ्यासात हाय ब्लड प्रेशनवर दही उपयोगी असल्याचे म्हटले आहे. परंतु, दह्यात साखर, मीठ किंवा कोणताही फ्लेवर न टाकता खा.

3 अंडे –
सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये उकडलेली अंडी जरूर खा. हे प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ऑम्लेटमध्ये काही भाज्या टाकून तयार करा.

4 नट्स, सीड्स आणि लो-फॅट डेअरी –
ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी डाएटमध्ये जास्त पोटॅशियम घेण्याचा सल्ला हेल्थ एक्सपर्ट देतात. नट्स आणि सीड्समध्ये ते भरपूर असते. नाश्त्यात एक ग्लास लो फॅट मिल्कसह काही नट्स किंवा सीड्स सेवन करा. भोपळ्याचे बी, पिस्ता, बदाम, काजू आणि अक्रोड खा.

5 केळी आणि बेरीज –
केळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. सोडीयम अजिबात नसते. यात अँटी ऑक्सीडेंट आढळते. हे ब्लड प्रेशर कंट्रोल करते. केळीसोबत बेरीजसुद्धा खाऊ शकता.