Hypertension Causes And Prevention | यामुळे वाढतोय हायपरटेन्शनचा त्रास, जाणून घ्या औषधांशिवाय कसं नियंत्रण ठेवाल?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनियंत्रित उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी आणि गंभीर आरोग्य समस्या आहे (Hypertension Causes And Prevention). याला सायलेंट किलर डिसीज (Silent killer disease) म्हणून ओळखले जाते. या नंतर हृदयविकाराचा धोका (Heart Attack Causes) निर्माण होतो. इतकेच नव्हे तर, जर हायपरटेन्शनवर (Hypertension Symptoms) वेळीच उपचार केले गेले नाहीत तर मूत्रपिंड निकामी होणे, फुफ्फुस-हृदय आणि अगदी ब्रेन स्ट्रोकचा धोका (Kidney Failure, Lung-Heart And Brain Stroke Risk) देखील वाढू शकतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इम्पिरियल कॉलेज लंडन (Imperial College London) यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन दशकांत उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांची संख्या ६५० दशलक्षांवरून १.२८ अब्जांवर गेली आहे (Hypertension Causes And Prevention).

 

जवळजवळ अर्ध्या लोकांना हे माहीत नसते की त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. म्हणून सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होते. सामान्य जीवनाशी संबंधित काही घटकांमुळे ही समस्या वाढते, त्याबद्दल विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे (Hypertension Causes And Prevention).

 

उच्च रक्तदाब वाढवणारे घटक (Causes of High Blood Pressure) –
ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. मायकेल ग्रेगर (Dr. Michael Greger) यांनी नुकतेच उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. आपल्या लेखात ते स्पष्ट करतात, उच्च रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी संतुलित आहार (Balanced Diet) घ्यायला हवा. अमेरिकन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर केलेल्या एका अभ्यासात असे आढळले आहे की ज्या लोकांनी जास्त मांसाहार केला त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या जास्त झाली आहे. ही बाब सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवी.

 

शाकाहार फायद्याचा (Benefits of Plant Based Foods) –
वनस्पती आधारित पदार्थांना फायदा करून देणार्‍या संशोधनादरम्यान डॉ. ग्रेगर यांना असे आढळले की, गटातील विद्यार्थ्यांनी काही काळ मांसाचा आहार वगळता वनस्पती-आधारित वस्तूंचे सेवन वाढविले, तेव्हा त्यांचा रक्तदाब सामान्य झाला. इतकंच नाही तर हाय बीपीसाठी (High BP) औषध घेणार्‍या अनेकांनी आहारात असा बदला केल्यानंतर त्यांचे सुरू असलेले औषधही कमी झाले.

डॉ. ग्रेगोर म्हणतात की, उच्च रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी वनस्पती –
आधारित अन्न आपल्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. दूध, डेअरी, मासे, अंडी, चिकन (Milk, Dairy, Fish, Eggs, Chicken) यांसारख्या गोष्टींचे नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा त्रासही वाढू शकतो, असेही आहारतज्ज्ञ डॉ. ग्रेगर यांनी लेखात नमूद केले आहे.

 

आरोग्याच्या या वाढत्या समस्येचा धोका कमी करण्यासाठी, प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहून
संपूर्ण धान्य आणि पौष्टिक भाज्यांचा समावेश अन्नामध्ये करून औषधांशिवायही त्यावर नियंत्रण ठेवता येते.
जास्त फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे (Fruits, Vegetables And Low-Fat Dairy Products) सेवन करा.
संतृप्त आणि ट्रान्स फॅटसह कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी असलेल्या पदार्थ वर्ज करा.
कडधान्ये, मासे, कोंबडी आणि काजूचे सेवन करा (Eat Whole Grains, Fish, Chicken And Nuts).
सोडियम, गोड फूड ड्रिंक्स आणि लाल मांसाचं सेवन अत्यंत नियंत्रित प्रमाणात करा
(Sodium, Sweet Food Drinks And Red Meat Eat in Moderation).

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Hypertension Causes And Prevention | hypertension causes and prevention how plant based food good for high blood pressure

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol Control Diet | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा, जाणून घ्या

 

Diabetes Control | जाणून घ्या – शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणते 3 योग आहेत प्रभावी

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये ‘हे’ औषध, मुलांमध्ये वाढू शकतो ‘या’ गोष्टीचा धोका