Hypertension | ‘हाय ब्लड प्रेशर’च्या रुग्णांनी सेवन कराव्यात ‘या’ 4 गोष्टी, होणार नाही समस्या

पोलीसनामा ऑनलाइन – Hypertension | बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल लोकांमध्ये हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) ची समस्या समोर येत आहे. हाय ब्लड प्रेशर हा तरुणांमधील सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. हाय ब्लड प्रेशरमुळे शरीरात हृदयाची समस्या (Heart Problem) देखील होऊ शकते. मात्र, तुमच्या जीवनशैलीत बदल करून तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रित (Blood Pressure Control) करू शकता (Hypertension).

 

जर तुम्ही हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर तुम्ही जास्त खारट, गोड आणि चरबीयुक्त अन्न खाऊ नये. अशा गोष्टी खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढू शकतो. जर तुम्ही काही फळे, भाज्या, अन्नधान्ये यांचा समावेश केला तर तुम्ही रक्तदाब सामान्य करू शकता (Hypertension).

 

या गोष्टी खाल्ल्याने नियंत्रित होईल रक्तदाब (Blood Pressure Will Be Controlled By Eating These Things)

1. भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)

याशिवाय भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. ते खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम (Potassium, Magnesium) आढळून येते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

 

2. फॅटी फिश (Fatty Fish)

फॅटी फिश खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो. माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड (Omega-3 Fatty Acid) असते, जे आपले हृदय तंदुरुस्त ठेवते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

 

3. जांभूळ (Java Plum)

जांभूळ ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. जांभळामध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) मुबलक प्रमाणात आढळतात. जांभूळमध्ये असलेले अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट्स (Anthocyanin Antioxidants) रक्तातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी (Nitric Oxide Level) वाढवतात. यामुळे रक्तदाब कमी होतो.

4. पिस्ता (Pistachio)

पिस्ता एक असा ड्राय फ्रूट आहे, ज्याचा आहारात समावेश केलाच पाहिजे.
हे खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.
पिस्त्यात पोटॅशियम (Potassium) आणि अनेक पोषक घटक (Nutrients) असतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hypertension | hypertension or high bp hypertension patient should eat bananas pumpkin seeds berries pistachios fatty fish

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा