धक्कादायक ! इलेक्ट्रिक कार देखील नाहीत 100 % ‘सुरक्षित’, ‘इलेक्ट्रिक वाहनांना ‘आग’ लागल्याच्या घडल्या घटना (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देत आहे. लवकरात लवकर अनेक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर उतरावीत यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. परंतू सध्या इलेक्ट्रिक वाहनांना आग लागत असल्याचे प्रकार आता समोर येत आहे, ज्यानंतर आता या वाहनांच्या सुरक्षेसंबंधित गंभीर प्रश्न समोर येत आहे.

नुकतीच भारतात दाखल झालेली आणि मोठी जाहिरातबाजी होत असलेली इलेक्ट्रिक एसयूवी ह्यूंडाय कोनाला आग लागत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना २६ जुलैला कॅनडाच्या मॉन्ट्रियलच्या ली बिजार्डमध्ये घडली. समोर येत असलेल्या माहिती वरुन स्पष्ट होत आहे की या कारला चार्जिंग करत असताना आग लागली. या प्रकारानंतर आता अत्यंत सुरक्षित मागले जात असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या इलेक्ट्रिक कारला आग लागण्याच्या या काही पहिल्या घटना नाहीत.

या आधी २१ एप्रिलला देखील इलेक्ट्रिक कार बनणारी जगातील मोठी कंपनी टेस्ला मोटर्सच्या मॉडेल एस इलेक्ट्रिक कारला आग लागल्याची घटना समोर आली होती. यावेळी ही कार शंघायच्या एका पार्किंगमध्ये उभी होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की या कारला अचानक आग लागली आणि ही आग वेगाने सर्वत्र पसरली. या दरम्याना कॅलिफोर्नियाच्या लॉस गॅटोसमध्ये पार्किंगमध्ये उभी होती आणि नव्या टेस्ला मॉडल एसला अचानक आग लागली. यानंतर कार ओढून बाहेर काढण्यात आले, परंतू कार जळतच होती.

इलेक्ट्रिक कारची आग पाण्याने विझवणे अवघड
पेट्रोल डिझेलच्या वाहनाला लागलेली आग विझवणे सोपे आहे परंतू इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या कारला पाणी टाकून विझवणे अत्यंत धोकादायक ठरु शकते. कारण यात असलेली लिथियमची बॅटरी पाण्याचे जास्त आग पकडू शकते. ही कार इलेक्ट्रिक असल्याने त्यात पाण्याने इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे.

चूकीच्या इलेक्ट्रिक चार्जरचा वापर घातक
कार इलेक्ट्रिक असल्याने चार्जिंग कुठेही अचानक उतरल्यास अयोग्य चार्जरचा वापर केल्यास बॅटरी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे चूकीच्या चार्जरने वाहन चार्ज केल्यास कारला अचानक आग लागण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like