भारतात Hyundai KONA इलेक्ट्रिक कार ‘लाँच’ ; एकदा ‘चार्ज’ करून ४२५ किमी चालवा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वीच सादर करण्यात आला होता. त्यात देशातील इलेक्ट्रीक गाड्यांवर सवलती देण्यात आल्या आहे. त्यामुळे देशातील इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढण्याची शक्यता होती. त्यात आता देशात Hyundai KONA ही इलेक्ट्रीक कार लाँच झाली आहे. या कारची किंमत २५.३० लाखांपासून सुरु होते. हे दर शोरूमसाठीचे आहेत. त्यामुळे याची किंमत पूढे वाढण्याची शक्यता आहे.

या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्ये म्हणजे या कारची बॅटरी ५७ मिनिटांमध्ये फूल चार्ज होते. त्यात ५० किलोवॅट डिसी पॉवरच्या चार्जरची आवश्यकता आहे. साध्या AC स्त्रोतासह चार्ज केले तर त्यासाठी ६ तास १० मिनिटे लागू शकतात. त्यासाठी हुंदाई कंपनीने कारसह होम चार्जर देणार आहे. तसंच ग्राहकांसाठी डिलरशीप्समध्ये चार्जिंग स्टेशन केले जाणार आहेत. देशातील मोठ्या चार शहरांत इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर चार्जिंगचे स्टेशन्स बनवले जाणार आहेत. गाडी एकदा फुल चार्ज केली तर तब्बल ४२५ किलोमीटर चालू शकते. गाडी ९.७ सेकंदात प्रति तासाला १०० किलोमीटर स्पीडने चालते.

हुंडई कोनामध्ये Eco, Comfort, Sport, असं तीन ड्राइव्ह मोड दिले आहेत. गिअरबॉक्सविषयी बोलायचे झाले तर वन-स्पीड स्वयंचलित आहे.

दरम्यान, सध्या भारतात इलेक्ट्रीक गाड्यांच्या खरेदीवर ५ टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आला आहे. तसंच या गाड्या खरेदी लोनवर करण्यातही सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्या खरेदी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळेल.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान