भारतात ‘Hyundai Kona’ लॉन्च झाल्यानंतर आणखी ‘या’ ५ शानदार ‘इलेक्ट्रिक’ कार लवकरच ‘लॉन्च’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात येणाऱ्या वर्षात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसतील. कारण सरकार स्वतः या इलेक्र्ट्रिक गाड्यांच्या वापराला प्रोस्ताहन देत आहेत. यासंबंधित अर्थसंकल्पात सरकारने घोषणा देखील केल्या आहेत. सरकारच्या सक्रियतेमुळे वाहन कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहन निर्माणावर लक्ष केंद्रीत करत आहे.

ह्युंडाय कंपनीने ९ जुलैला इलेक्ट्रिक SUV KONA ही नवी इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. याची किंमत २५.३० लाख रुपये असणार आहे. कंपनीने दावा केला आहे की ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ४५२ किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे. ही SUV फक्त ९.७ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. याशिवाय आता आणखी ५ नव्या शानदार इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.

Hyundai KONA के बाद ये 5 इलेक्ट्रिक कारें भी भारत में जल्द होंगी लॉन्च

१. निसान लिफ (Nissn Leaf)

या वर्षाच्या शेवटापर्यंत निसान लीफ ही कार भारतात लॉन्च करण्यात येणार आहेत. या कारची किंमत ३५ ते ४० लाख रुपये असणार आहे. भारतात लॉन्च होणारी ही कार ४० kWh बॅटरी पॅकची असणार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार ४०० किलोमीटर पर्यंत धाव शकते.

Hyundai KONA के बाद ये 5 इलेक्ट्रिक कारें भी भारत में जल्द होंगी लॉन्च

२. एमजी हेक्टर (MG Hector)

MG Hector ला भारतात चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. ४ जुलैला या कारची बुकिंग सुरु झाली आहे. या कंपनीने एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक SUV eZS सादर केली आहे. आता लवकरच भारतीय बाजारात MG मोटार्स इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. या डिसेंबर पर्यंत ही कार भारतात सादर होणार आहे. याची किंमत २५ लाख रुपये असणार आहे. ही कार चार्ज झाल्यानंतर ३०० किलोमीटर धावू शकेल.

Hyundai KONA के बाद ये 5 इलेक्ट्रिक कारें भी भारत में जल्द होंगी लॉन्च

३. महिंद्रा eKUV १००
महिंद्रा कायमच इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात अग्रगण्य राहिला आहे. कंपनी eKUV १०० ही कार वर्षांच्या अखेरीस लॉन्च करु शकते. या कारची किंमत १० लाख रुपये असणार आहे. १५.९ kWh ची बॅटरी पॅक असणार आहे. इलेक्ट्रिक KUV १०० एकदा चार्ज झाल्यानंतर १२० Km वेगाने धावेल.

Hyundai KONA के बाद ये 5 इलेक्ट्रिक कारें भी भारत में जल्द होंगी लॉन्च

४. टाटा Altroz ev

इलेक्ट्रिक वाहनांच्या रेस मध्ये टाटा मोटर्स देखील मागे नाही, टाटा ही कार पुढील वर्षी भारतीय बाजारात येणार आहे. कंपनीने ही कार जिनिव्हा मोटार शोमध्ये सादर केली होती. एकदा चार्ज केल्यावर ही कार ३०० किलोमीटर धावू शकते. या कारचा किंमत १० लाख रुपये असणार आहे.

Hyundai KONA के बाद ये 5 इलेक्ट्रिक कारें भी भारत में जल्द होंगी लॉन्च

५. ऑडी e – Tron
लग्जरी कार निर्माता कंपनी ऑडीने देखील भारतात इलेक्ट्रिक कार ई-ट्रॉन ही कार सादर केली आहे. या कारची किंमत १.५ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. एकदा ही कार चार्ज केली तर ती ४०० किलोमीटर धावू शकते. भारतात ही कार वर्षाच्या अखेरीस लॉन्च होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या