झीरो डाऊन पेमेंटवर 1.3 लाखात घरी आणा Hyundai Santro, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या कार सेक्टरमध्ये कमी बजेटच्या मायलेज कारची मोठी यादी आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने ऑल्टो, वॅगनआर, हुदाई सँट्रो (Hyundai Santro), आय 10 आणि डॅटसनसारख्या कारला पसंती आहे. आज आपण हुंदाई सँट्रो (Hyundai Santro) कारची माहिती घेणार आहोत. जी कमी किंमत, स्पोर्टी डिझाइन आणि जास्त मायलेजसाठी पसंत केली जाते.

हुंदाई सँट्रोची दर्शनी किंमत 4.76 लाख
(Hyundai Santro) दर्शनी किंमत 4.76 लाख रुपये आहे. जी टॉप मॉडेलमध्ये 6.44 लाख रुपये होते. परंतु येथे ज्या ऑफरबाबत आपण जाणून घेणार आहोत ती कार अवघी 1.3 लाखात घरी घेऊन जाऊ शकता.

हुंदाई सँट्रोचे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीची ही हॅचबॅक सेगमेंटची एक बेस्ट सेलिंग कार आहे. तिच्यात चार व्हेरिएंट आहेत.

1086 सीसीचे 1.1 लीटर क्षमतेचे इंजिन आहे. जे 69 पीएसची पावर आणि 99 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

5 स्पीड मॅन्युअल गियर दिले आहेत.

कंपनीचा दावा आहे की ही कार 20 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.

ही कार स्वस्तात खरेदी करण्याची अशी आहे ऑफर
ज्यांच्याकडे नवीन कार खरेदी करण्याचे बजेट नसते त्यांच्यासाठी चांगला पर्याय असतो सेकंडहँड कार खरेदी करण्याचा. ही ऑफर CARS24 ने दिली आहे, जी एक ऑनलाइन कार खरेदी-विक्रीची वेबसाइट आहे.

 

जानेवारी 2010 चे मॉडल

या वेबसाइटवर ही कार अवघ्या 1,30,893 रुपयांत लिस्ट केली आहे. या कारचे मॉडल जानेवारी 2010 चे आहे. तर ओनरशिप सेकंड आहे. कार नॉन अ‍ॅक्सीडेंट असून ती आतापर्यंत 51,217 किलोमीटर धावली आहे. तिचे रजिस्ट्रेशन हरियाणाच्या एचआर 51 आरटीओचे आहे.

कोणतीही कपात न करता पूर्ण पैसे परत
ही कार खरेदी केल्यास कंपनी सहा महिन्याच्या वॉरंटीसह सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी सुद्धा देत आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार, जर कार खरेदी केल्याच्या सात दिवसात पसंत न आल्यास ती कंपनीला परत करता येऊ शकते. ज्यानंतर कंपनी कोणतीही कपात न करता पूर्ण पैसे परत करेल.

3,109 रुपयांचा मंथली ईएमआय
याशिवाय कंपनी ही कार लोनवर खरेदी करण्याची सुद्धा ऑफर देत आहे.
ज्यामध्ये तुम्ही ही कार तुम्ही झीरो डाऊन पेमेंटमध्ये खरेदी करू शकता.
यानंतर तुम्हाला पुढील 60 महिन्यापर्यंत 3,109 रुपयांचा मंथली ईएमआय भरावा लागेल.

Web Title :- Hyundai Santro | second hand hyundai santro in 1 3 lakh with zero down payment loan and money back guarantee plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Decision | प्रभाग पध्दतीवर ठाकरे मंत्रिमंडळाचे ‘शिक्कामोर्तब’ ! मनपा, नगरपालिका अन् नगर पंचायतीमध्ये ‘या’ पध्दतीची असेल ‘रचना’

Stock Market | रतन टाटा यांच्या कंपनीचे झाले 21400 कोटींचे नुकसान, मुकेश अंबानी यांना झाला मोठा फायदा; जाणून घ्या नेमकं काय झालं

TATA Group च्या ‘या’ 2 शेयरमधून राकेश झुनझुनवाला यांनी एका महिन्यात कमावले 893 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का?