Hyundai ने सादर केली ‘सोलर’वर चालणारी कार, ४ तासात होणार ‘चार्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात सध्या वाहनाबाबत रोज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आता वाहन निर्मात्या कंपन्या पेट्रोल, डिझेल शिवाय इतर पर्यायांचा विचार करत आहे. इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्यावर आता सोलर वर चार्ज होणाऱ्या कार बाजारात दाखल होत आहे. दक्षिण कोरियाची जगभरातील प्रसिद्ध कंपनी Hyundai ने आपली प्रीमियम सडान कार Sonata हायब्रिड नव्या सोलर रुफ सिस्टिमबरोबर सादर केली आहे. जी सूर्याच्या प्रकाशाने चार्ज होईल आणि वापरता येईल.
नव्या Hyundai Sonata हायब्रिडमध्ये कंपनीने जागातील पहिली एक्टिव शिफ्ट कंट्रोल तंत्रज्ञान आणि सोलर रुफ सिस्टिमचा प्रयोग करण्यात येणार आहे. यात कंपनी कास्काडिंग ग्रिल, रियर स्पॉयलर आणि एलॉय व्हील चा प्रयोग केला आहे. ज्यात त्यांनी एक इको फ्रोंडली कार सादर केली आहे.

कंपनीचा दावा आहे की, या कारमध्ये प्रयोग करण्यात आलेल्या सोलर रुफ सिस्टम सूर्याच्या प्रकाशात चार्ज होईल. ज्यामुळे कार जास्त अंतर कापू शकेल. दररोज 4 तास चार्ज केल्यानंतर या कारमध्ये एवढी ताकद असेल की, ही कार १,३०० किलोमीटर जास्त चालेल. या शिवाय या कारमध्ये ASC तंत्रज्ञान देण्यात आले आहे आणि या कारचा ड्रायविंग एक्सपेरिएंस देखील उत्तम आहे.

नव्या Sonata मध्ये कंपनीने स्मार्ट स्ट्रीम G2.0 GDi इंजिन दिले आहे. ज्यात १५० bhp च्या पॉवरने आणि १८८ Nm च्या टॉर्क जेनरेट करेल. याशिवाय यात लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटार ३८ kw ची पॉवर आणि २०५ Nm टार्क जनरेट करेल. याची कंबाइंड सिस्टिम २०.१ किलोमीटरचा माइलेज देईल.

आरोग्यविषयक वृत्त –