… म्हणून माझ्या पाकिटामध्ये कायम चार्ली चॅप्लिनचा फोटो असतो : अक्षय कुमार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतातील बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता असलेल्या अक्षय कुमारने शब्दांशिवाय सिनेमा किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे असल्याचे सांगितले आहे. जगातल्या या सर्वात लोकप्रिय विनोदवीराची आज 131 वी जयंती. आपल्या आईसाठी वयाच्या पाचव्या वर्षी त्याने पहिल्यांदा स्टेजवर कला सादर केली होती. अचानक तब्येत बिघडल्याने त्याची आई एका कार्यक्रमात परफॉर्म करू शकत नव्हती, तेव्हा ऐनवेळी चार्लीने तीची भूमिका साकारली होती. येथून सुरु झालेला चार्लीचा प्रवास नंतर इतिहासांच्या पानांमध्ये लिहिला गेला.

बॉलिवूडमधील असाच एक बडा कलाकार चार्लीचा मोठा चाहता आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार चार्लीचा फोटो कायम आपल्या पाकिटात ठेवतो. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये अक्षयनेच यासंदर्भात माहिती दिली होती. चॅप्लिनचे वास्तव जीवन आणि सिनेमातील चॅप्लिन हे पूर्णपणे वेगळे होते. तरी आजही चार्ली अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. अनेकांना केवळ त्याच्या फोटोकडे पाहिले तरी हसू येते. चार्लीच्या फोटोकडे पाहून मला कठीण प्रसंगी प्रेरणा मिळते असे अक्षयने सांगितले होते.

‘माझ्या पाकिटात नेहमीच प्रसिद्ध विनोदवीर चार्ली चॅपलिन यांचा फोटो असतो. कधीही आयुष्यात कठीण प्रसंग आला की मला चार्ली यांचे विचार आठवतात. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास आहे. ते आणि त्यांचे सिनेमे हे माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. एवढा मोठा कलाकार असूनही त्यांची नम्रता खूप काही शिकवून जाते.’, असे अक्षय चार्ली चॅप्लिनबद्दल म्हणाला होता.