भाजपामध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीच ! कोणालाही डावललं नसून मी स्वतः OBC, गिरीश महाजनांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात आहे असे आरोप केले जात होते. भाजपला विरोधी पक्षात बसायला लागल्यानंतर पक्षाला अपयश का आले ? याला नेमके कोण जबाबदार ? असे अनेक प्रश्न पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले होते त्यानंतर प्रकाश शेंडगे आणि विजय वडेट्टीवार अशा नेत्यानी भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याचे आरोप केले होते. मात्र या सर्व आरोपांना आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका करताना रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपलाच जबाबदार धरले होते. तसेच पक्ष लोकसभेची निवडणूक मोदींच्या पुण्याईने जिंकला आणि काहींना वाटू लागले की आपल्या कामगिरीमुळे जिंकला. निवडणुकीच्यावेळी जे जे नेतृत्व करत फिरत होते त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर देखील भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आली होती. पंकजा मुंडे याचा पराभव दखल स्वकीयांनीच केला आहे. असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला होता तर काँग्रेसच्या विजय वड्डेतीवर यांनी खडसे, बावनकुळे अशा नेत्यांची नावे घेऊन भाजप ओबीसी नेत्यांना डावलत असल्याचा आरोप केला होता.

खडसेंना उत्तर देताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ओबीसी नेत्यांनाच भाजपमध्ये सर्वाधिक स्थान असल्याचे सांगितले होते. तसेच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाबाबतच्या व्यक्तींची नावे खडसेंनी पुराव्यानिशी जाहीर करावीत असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

भाजपमध्ये कोणत्याही ओबीसी नेत्याला डावलले जात नाही उलट भाजपमध्येच सर्वाधिक ओबीसी नेते आहेत. एवढेच काय पण १०५ आमदारांपैकी सर्वाधिक आमदार हे ओबीसी आहेत तर बहुजन आणि मराठा समाजाचे आमदार देखील तेव्हडेच आहेत असे स्पष्टीकरण देखील महाजन यांनी यावेळी दिले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like