home page top 1

”पोलीस आयुक्तांच्या खुर्चीचा अपमान झाल्याने मी संतप्त”

वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात हल्लाबोल करत धरणे आंदोलन सुरु केलं आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तपास अधिकारी आणि कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून देशभरात वातावरण तापले आहे. यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या एका कार्यक्रमामध्ये ‘मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही, टीएमसी नेत्यांना केंद्राने पकडले तेव्हा रस्त्यावर उतरले नव्हते, पण राज्याच्या राजधानीच्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीचा अपमान झाल्याने संतप्त झाले आहे.’ असे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोनल पुकारल्याने ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी सरकार असं चित्र निर्माण झालं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रोझ व्हॅली, पॉन्झी आणि इतर घोटाळे भाजपा केंद्रात सत्ता येण्याआधी झाले असल्याचं सांगितलं आहे. याचवेळी त्यांनी सीबीआय चौकशीला इतक्या का घाबरत आहात? असा सवाल ममता बॅनर्जी यांना केलं आहे.

दरम्यान, सीबीआयने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, कोलकाता पोलिस आयुक्तांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे. तसेच चिडफंड घोटाळ्यातील पुरावे ते नष्ट करु शकतात असा आरोप सीबीआयने याचिकेत केला आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1092392872937168897/photo/1

Loading...
You might also like