सारा अली खान म्हणते ; माझे आई-वडिल वेगळे झाले हे चांगलंच झाले

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची कन्या सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. तिच्या कामाचं आणि अभिनयाचे सर्वांनीच खूप कौतुक केले. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा ‘सिम्बा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाला भूरळ पाडली आणि कमी वेळात तिचा वेगळा असा चाहता वर्ग तयार झाला.

सारा पदार्पणातच यशस्वी वाटचाल करत आहे. त्यामुळे आई-वडिल विभक्त असले तरी मुलीच्या यशाचा त्यांना आनंद तर असेलच. साराने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपल्या आई-वडिलांच्या विभक्त असण्यावर वक्तव्य केलं आहे. आपले पालक वेगळे झाले हे एका अर्थी चांगलच झाले, असं साराने म्हटलं आहे. याचं कारणही तिनं सांगितलं आहे.

मी वडिलांसोबत एकत्र राहत नसले तरी ते माझ्या मदतीसाठी कुठेही असले तरी धावून येतील. त्यामुळे ते माझ्यासोबत नाहीत असं मला कधीच वाटलं नाही. माझे आई-वडील एकत्र राहत नाही ही गोष्ट एकाअर्थी चांगली आहे. कारण मला माहिती आहे की ते दोघंही एकत्र कधीच खूश राहिले नसते आणि माझे पालकच जर एकमेकांसोबत खूश नाहीत तर मीही आनंदी राहिले नसते, असं सारा म्हणाली.

दरम्यान, सारा आपली आई अमृता सिंगसोबत राहत आहे. तर सैफ-करिनाचा नवा संसारही सुरु आहे. त्यांच्या या लग्नामुळे साराने कधीही वडिल आणि मुलीच्या नात्यात दुरावा आणला नाही. तर ती खुद्द स्वतः आपल्या वडिलांच्या लग्नात सहभागी झाली होती.

You might also like