इरफान पठाणच्या पत्नीच्या फोटोवरून नवा वाद, क्रिकेटर म्हणाला – ‘मी तिचा मालक नव्हे तर जोडीदार’

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने पत्नी सफा बेफा हिचा चेहरा ब्लर केला आहे. यावरून नवा वाद सुरु झाला आहे. या फोटोवरून अनेकांनी सोशल मीडियावर इरफानवर टीका करत प्रश्नांचा भडीमार केला. तर काहींनी त्याला स्त्री-पुरूष समानतेची आठवण करून दिल्याने या फोटोसाठी इरफानला स्पष्टीकरण द्यावं लागलं.

 

 

 

 

तो म्हणाला, माझ्या मुलाच्या अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला गेला आहे. या फोटोवरून अनेकांनी माझ्यावर टीका केली. परंतु, माझ्या पत्नीनं स्वतःहून तिचा चेहरा ब्लर केला असल्याचे त्याने सांगितले. तसेच मी तिचा मालक नाही तर जोडीदार आहे असेही त्यानं स्पष्ट केल. यापूर्वीही इरफान पठाणनं अनेकदा पत्नीसह फोटो पोस्ट केले आहेत, परंतु त्या प्रत्येक फोटोत तिचा चेहरा झाकलेला दिसत आहे. इरफान पत्नीसोबत रूसमध्ये गेला होता तेथील फोटोमध्येही सफाचा चेहरा झाकलेला दिसत आहे.

 

 

 

आखाती देशांत सफा बेग ही मॉडल होती. २८ फेब्रीवारी १९९४ मध्ये तिचा जन्म हैद्राबाद येथे झाला असून ती लहानाची मोठी सौदी अरेबियात झाली आणि तिथेच तिनं शिक्षण पूर्ण केलं. सफा आणि इरफान यांची दुबईत भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये दोन वर्षे प्रेमसंबंधात होते. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनीही लग्न केलं.