काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा निरर्थक : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत होती. नारायण राणे यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी एका खाजगी वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली होती. मात्र आता यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत या प्रवेशाची शक्यता नाकारली.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले कि,मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही आणि तसा काही प्रस्तावही नाही. मी एनडीएमध्येच आहे आणि राहणार,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्यांनी हि शक्यता फेटाळून लावली आहे.

दरम्यान, एनडीएच्या घटकपक्षांच्या बैठकीसाठी दिल्लीला जाण्याआधी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर काँग्रेस प्रवेशाची चर्चा कुठून सुरू झालीय ? माझी कुणासोबतही चर्चा झाली नाही. काँग्रेस प्रवेशाचा प्रश्नच नाही,’ असं राणे उद्वेगानं म्हणाले.