रोहित पवार म्हणाले – ‘धमकीला घाबरत नाही, पण चर्चा करायला विचारांची लेव्हल लागते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवरती वाकयुद्ध रंगलं होत. साखर उद्योगासंदर्भातील शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रावरून निलेश राणेंनी ट्विटरवरुन काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नाला रोहित पवार यांनी उत्तर दिलं होत.

निलेश राणेंना उत्तर दिल्यानंतर राणे यांनी रोहित पवारांवरती टीका केली होती. त्यानंतर या वादात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली होती. या वादातून निलेश राणे यांनी रोहित पवारांना थेट धमकीच दिली होती. परंतु, त्यावरती काहीच प्रतिक्रिया न देणाऱ्या रोहित वर यांनी निलेश राणे यांच्या धमकीला मी घाबरत नसल्याचं म्हटलं आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निलेश राणेंनी दिलेल्या धमकीवरून ट्विट करत आमदार रोहित पवार म्हणाले की, आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो असा टोला राणेंना लगावला होता. त्यानंतर रोहित पवारांच्या ट्विटला निलेश राणेंनी प्रत्युत्तर देत म्हटलं, बोलणाऱ्याची लायकी बघून मी उत्तर देतो धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझं काम मला माहिती आहे, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तुला अशी अप्रत्यक्षरीत्या धमकी दिली होती. राणेंच्या या ट्विटनंतर रोहित पवारांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलेलं.

पण आज एका वृत्तवाहिनीला बोलताना रोहित पवारांनी म्हटलं, ‘चर्चा करण्यासाठी कुठेतरी विचारांची लेव्हल लागते, ती लेव्हल त्या ठिकाणी मला जाणवली आहे. अनेक अभ्यासू लोकांनी मला याकडे दुर्लक्ष करण्यास सुचवलं. त्यामुळे मी आता याकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, नितेश राणेंकडून देण्यात आलेल्या धमकीवर बोलतानाही, मोकळ्या भांड्याचा आणि भरलेल्या भांड्याचा फरक सांगत, मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येत असतो. त्यामुळे, या धमकीला मी घाबरत नाही, अन अशा धमकींना कुणीही घाबरत नसतं, असे म्हणत नितेश राणेंकडे आता आपण दुर्लक्ष करत असल्याचे’ आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like