अभिनेत्री नेहा पेंडसेचा खुलासा, म्हणाली – ‘न्यूड सीन देण्यास माझा नकार नाही, पण…’

पोलीसनामा ऑनलाइन – बेधडक, बिनधास्त भूमिका करणारी ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे हीने काही दिवसापूर्वीच बॉयफ्रेंड शार्दुलशी लग्न केले आहे. त्यानंतर काही दिवसापूर्वी तिने ईं-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत भविष्यात न्यूड सीन देण्याविषयी विधान केले होते. न्यूड सीन देण्यास मला कोणतीही अडचण नाही. पण ज्याची कथा लव्ह मेकिंग आणि किसिंग सीन भोवती फिरते अशा चित्रपटात मी काम करणार नसल्याचे ती म्हणाली.

नेहा पेंडसे म्हणाली की, एकवेळ अशी होती की, मला वाटायचे की, ना लव्ह मेकिंग सीन ना किसिंग सीन मी केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिकेन. चांगल्या चित्रपटांमुळे मला एक गोष्ट कळाली जर चित्रपटाचे निर्माते चांगले असतील आणि असे सीन ते योग्य पद्धतीने दाखवणार असतील किंवा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये किसिंग सीन आणि न्यूड सीन देण्याची गरज आहे तर मी ते नक्की देईन, असे ती म्हणाली.

तसेच काही चित्रपटांची कथा केवळ किसिंग सीन आणि लव्ह मेकिंग सीनच्या भोवती फिरते अशा चित्रपटात मी काम करणार नाही. मी चांगले बोल्ड सीन देखील पाहिले आहेत. ते चांगले का आहेत कारण निर्मात्यांनी ते तशा पद्धतीने शूट करून चित्रपटात दाखवले आहेत. कधी कधी सीन चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते असेही ती म्हणाली.