‘मी नाही तर पवारांनीच माझे बोट धरले’ ; राज ठाकरे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात सभा घेऊन चर्चेत आले आहेत. राज ठाकरे आपल्या सभेत मोदींचा जुन्या आश्वासनाच्या व्हिडीओ दाखवून त्यांचा कामाची आठवण करून देत आहेत. त्यातच पवारांच्या जवळकतीमुळे, राज ठाकरे पवारांचा बोट धरून पुढे येतील का ? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीने केला होता. त्याला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोदींविरुद्ध भूमिकेमुळे आणि शरद पवार यांचा जवळकीमुळे राज ठाकरे राष्टवादी सोबत युती करतील का ? असा प्रश्न राज ठाकरे यांना एका वृत्तवाहिनीने केला. यावर राज यांनी मज्जेशीर उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर भाषणा मधून पवारांचे बोट धरूनच मी राजकारणात असल्याचे म्हणतात. याचा अर्थ असा होत नाही की राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी होणार. राजकारणापलीकडेही माझे पवारांशी संबंध आहेत., एकमेकांकडे जाणे येने आमचे होतच असते , याचा अर्थ युती किंवा आघाडी होणार असे नाही. सध्या तरी मी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेल, मी माझ्या पक्षाची आणि संघटनेची रणनीती तुम्हाला स्पष्ट करेल असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

तसेच माझा पवारांशी कुठलाही राजकीय संबंध नाही. आणि राहिला प्रश्न त्या फोटोचा तर तुम्ही जर फोटो नीट बघितला तर पवारांनीच माझे बोट धरले आहे. असे त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी पुणे येथे शरद पवारांची मुलाखत घेतली होती त्यावेळी, स्टेजवर चढतांना शरद पवारांनी राज ठाकरे यांचा हात धरला होता. त्यावेळी व्हायरल झालेल्या फोटोवरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी उत्तर दिले.