माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोठुनच विधानसभा लढवण्यास ‘इच्छुक’ नाहीत, पण…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर पक्षापक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस लागली आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवरांसाठी मुलाखती सुरु झाल्या आहेत. काँग्रेसकडूनही नांदेड जिल्ह्यातील विधानसभा लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना कालपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आमदार सुभाष झाम्बड आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे दोघे उपस्थित होते. आश्चर्य एका गोष्टीचे व्यक्त केली गेले की अशोक चव्हाण यांचा नेहमीचा भोकर मतदार संघासाठीही आज मुलाखतीचा कार्यक्रम झाला. तेथे अशोक चव्हाण मुलाखत घेणाऱ्याच्या भुमिकेत होते. मात्र त्यांनी स्वतः मुलाखत दिली नाही.

या सर्व गोष्टींवर अशोक चव्हाण यांनी खुलासा केला आहे. मी निवडणूक लढवण्यासाठीची पक्षाची जी प्रक्रिया असते ती पूर्ण केली आहे. मात्र आपण स्वतः पक्षाकडे उमेदवारी मागितली नसल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. तसंच पक्षाने आदेश दिले तर आपण निवडणुक लढवण्याबाबत निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितले. ते मुलाखतीनंतर माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, नांदेड लोकसभा मतदार संघ हा अशोक चव्हाणांचा किल्ला मानला जातो. परंतू २०१९ च्या झालेल्या निवडणुकीत इच्छा नसताना त्यांना लोकसभेसाठी पक्षाने उभे करण्याचा आग्रह केला होता. मात्र त्यांना या लोकसभेत विजयश्री मिळाली नाही. यात आता त्यांनी व्यक्त केल्यानुसार त्यांना विधानसभा लढवण्याची इच्छा नसल्याचेच समोर येत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे विधानसभा निवडणुका लढवतील की नाही यावर राजकिय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त –