आहो ! ‘मी सनी लिओनी नाही, मला अजिबात फोन करू नका’, ‘तो’ युवक वैतागला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सनी लिओनीमुळे एका तरुणाचे जगणे कठीण झाले आहे. या तरुणाला रोज सनी लिओनीचा नंबर समजून जवळपास ३०० कॉल येत आहेत. या तरुणाने घसा फाडून सांगितले की, तो सनी लिओनी नाही. तरीही कॉल काही थांबण्याचे नाव घेत नाही. सदर तरुण दिल्लीचा असून त्याचे नाव पुनीत अग्रवाल आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल की या तरुणाला सनी लिओनीच्य नावावे कॉल का येत आहेत.

नुकताच अर्जुन पटियाला हा सिनेमा रिलीज झाला. यात सनी लिओनीने एक फोन नंबर सांगितला आहे. यातील एका सीनमधील सनी लिओनीने सांगितलेला नंबर हा सनीचाच आहे असा समज लोकांनी करून घेतला आहे. असे समोर आले आहे की, हा फोन नंबर दिल्लीतील पुनीत अग्रवाल नावाच्या तरुणाचा असून तो दिल्लीतील पीतमपुरामधील रहिवासी आहे. लोक सनी लिओनीशी बोलण्यासाठी रोज कॉल करत आहेत आणि तो कॉल पुनीतला लागत आहे. सिनेमातील एका सीनने पुनीतचे जगणे मुश्कील केले आहे.

दरम्यान रोज सनी लिओनीसाठी येणाऱ्या फोन कॉलने बेजार झालेल्या पुनीतने असा सवाल उपस्थित केला आहे की, “माझ्या संमतीशिवाय माझा फोन नंबर सिनेमात वापरलाच कसा ?” पुनीतने सांगितले की, “लोक मला कॉल करून सनी लिओनीकडे कॉल देण्यास सांगत आहेत. काही लोक तर अश्लील भाषा वापरत आहेत. मी सर्वांना सांगून थकलो की, मी सनी लिओनी नाही. हा तिचा नंबर नाही. मला कॉल करू नका.”

रात्रंदिवस येणाऱ्या या कॉलने वैतागलेल्या पुनीतने अखेर या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, “आम्ही तक्रार नोंदवून घेतली असून या प्रकरणी पुढील तपास करत आहोत.”

आरोग्यविषयक वृत्त