‘आघाडीनं मला वापरावं इतका मी वेडा नाही’ : राज ठाकरे  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आघाडीनं मला वापरावं इतका मी वेडा नाही असे वक्तव्य  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शिवतीर्थावर राज ठाकरे गुढीपाडावा मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. राज ठाकरे हे महाराष्ट्रात सभा घेऊन ते नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणार आहेत. दरम्यान त्यांच्या या घोषणेनंतर आघाडी ही राज ठाकरेंना वापरून घेत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसली होती. त्या चर्चेला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मी महाराष्ट्रात 10 सभा घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राज ठाकरेंना वापरू घेत आहे. असे बोलले जात होते. आघाडीनं  मला वापरावं इतका मी वेडा नाही.” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी मोदींच्या विरोधात प्रचार करणार आहे तर  याचा फायदा राज्यातील उरलेल्या पक्षांनाच होणार ना ? की इतर राज्यातील पक्षांना होणार आहे ? आणि मी केलल्या प्रचाराचा फायदा जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होत असेल तर होऊ द्याना.” असे राज ठाकरे म्हणाले.

याशिवाय यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मोदी-शहा ही जोडगोळी देशाशी नीट वागली असती तर आज देशावर ही वेळ आली नसेल. मोदी आणि शहा हे देशावर आलेले संकट आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी त्या संकटाविरुद्ध लढणार आहे. यावेळीही मी या संकटांविरुद्ध लढणार आहे.”

मी महाराष्ट्रात ज्या सभा घेणार आहेत त्या सभा म्हणजे तुमच्यासाठी रिमाइंडर आहे. मोदींच्या कामगिरीचा सातबारा मांडण्यासाठी मी या सभा घेणार आहे. सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकार काय बोलले आणि आता काय बोलत आहेत हे सगळं दाखवण्यासाठी मी या सभा घेणार आहे. पतप्रधान मोदी हे मतांसाठी प्रत्येक गोष्टीचं भांडवल करत आहेत.” असा घणाघात राज ठाकरे यांनी यावेळी केला. याशिवाय बोलताना मोदींनी सुरु केलेल्या अनेक योजनांचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. नोटबंदी आणि बरोजगारी या मुद्द्यांवरही राज ठाकरे यांनी भाष्य केले.