डोक्यावर टिळा आणि भस्म लावणाऱ्यांची भीती वाटते, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान 

बदामी : वृत्तसंस्था – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यापूर्वी एका महिलेशी दुर्व्यव्हार केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ”डोक्यावर टीळा आणि भस्म लावणाऱ्यांची मला भीती वाटते असं वक्तव्य त्यांनी बदामी इथं बोलताना केलं”. त्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय. यासंदर्भातले व्हिडीओ ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिला आहे.

सिद्धारामय्या हे हिंदूंचा अपमान करत असल्याची टीका त्यांच्यावर होतेय. सिद्धारामय्या हे आपल्या फटकळपणासाठी प्रसिद्ध आहेत. असं वक्तव्य करून काँग्रेस कायम राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. ट्विटवरूनही सिद्धरामय्यांवर जोरदार टीका होत आहे.

त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. नेटकऱ्यांनी लगेच त्यांचे आणि राहुल गांधींचे टिळा लावलेले फोटो उत्तरादाखल त्यांना पाठवले. कर्नाटकात लिंगायतांचा प्रभाव असून डोक्यावर भस्म लावणं हा त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर दररोजच्या आचरणात त्याला अतिशय महत्त्व आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने या वक्तव्यावरून काँग्रेसला धारेवर धरलंय.