‘मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार’ : पंकजा मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना शिवसेनेनं (Shivsena) पक्षात येण्याची ऑफर दिली होती. या ऑफरवर पंकजा मुंडे (pankja munde) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मी खुल्या मनाच्या राजकारणाची (politics) वारसदार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी गोपीनाथ मुंडे (gopinath munde) आणि विलासराव देशमुख (vilasrao deshmukh) यांच्या भाषणांची जुगलबंदी पाहिली आहे. मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकली आहेत. या गोष्टी राजकारणाचा भाग असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे यांना देखील शिवसेनेने ऑफर दिली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आज भगवानगडावरून पंकजा मुंडे या महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतल्या (election) पराभवानंतर चार ते पाच महिन्यांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. ऊसतोड कामगार आणि इतर सर्वच गोष्टींवर मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. मी स्वत: भगवान गडावर दर्शनाला निघाली आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्तेही असतील त्या सर्वांसोबत मी निघाली आहे. भगवान गडावूरन मी ऑनलाइन संवाद साधणार आहे. लोकांना तिथे न येण्याचं आवाहनही मी केलं आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याचीही चर्चा आहे यावर त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या प्रीतम मुंडे यांना ताप आला आहे. त्यांची कोविड टेस्टही करण्यात आली पण ती निगेटिव्ह आली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणं ही गोष्ट माझ्यासाठी दु:खाची आहे. याबाबत धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.