‘मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, पंकजाताई काळजी घ्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्या विलगीकरणात आहेत. पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि.29) सकाळी ट्विट करुन आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली. दरम्यान, यानंतर त्यांचे बंधू आणि राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बहिणीसाठी ट्विटरवर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मोठा म्हणून मी सोबत असल्याचे सांगत त्यांना धीर दिला आहे. धनंजय मुंडे यांनीही कोरोनाचा सामना केला असल्याने पंकजा मुंडेंना होणाऱ्या त्रासाची मला जाणीव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडेंचं ट्विट

मी कोरोना पॉझिटिव्ह आले असून आगोदरच विलगीकरणात आहे, कोरोना बाधितांच्या परिवाराला भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेल. माझ्या समवेत दौऱ्यात असणाऱ्यांनी टेस्ट करुन घ्यावी, काळजी घ्यावी, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडेंचे ट्विट

धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे., ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केला आहे. यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करुन घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या, ताई. अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

अगोदरच झाल्या क्वारंटाइन

एकाच रुग्णवाहिकेत 22 जणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना करण्यात आली होती. ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातील आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावे, हे मला समजत नाही, अशा शब्दात पंकजा यांनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. मी आयसोलेटेड असल्याने मला ही बातमी उशिरा समजली, असेही त्यांनी यावेळी सांगितेल होते.