मन की बात ! ‘लॉकडाऊनच्या ‘गैरसोयी’बद्दल ‘माफी’, पण गरजेचं होतं’, नरेंद्र मोदींनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे देशात लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयाची अमंलबजावणी करण्यात आली आहे. लोकांचा जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी देशाची माफी मागतो अशा शब्दत पंतप्रधान नरेंदृ मोदी यांनी ट्वीट केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरसविरोधातली ही लढाई आहे. त्यामुळे लॉकडाउन पुकारावा लागला आहे. मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशाची माफी मागितली. लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत आहात असे नाही. तर लॉकडाउन पाळून तुम्ही स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.