‘माझा काही ‘भरोसा’ नाही’, एकनाथ खडसेंच्या भाषणातील ‘या’ 21 महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – आज गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेच्या आवाहनानंतर राज्याभरातील कार्यकर्ते, समर्थक जमा झाले होते. यावेळी भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, प्रकाश मेहता, एकनाथ खडसे उपस्थित होते. यावेळी गोपीनाथ गडावर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. यावेळी मी पक्ष सोडेल की नाही हे काही सांगता येत नाही असे म्हणत त्यांनी राजकीय संकेत देखील देण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी आपली पक्षातील नाराजी उघड केली. एकनाथ खडसेंनी यावेळी अनेक मुद्यावर भाष्य केले.

– पंकजा मुंडेंची कायम साथ देणार
– भाजपमध्ये कोणीतरी छळतंय असे जानकर म्हणत आहेत.
– महाराष्ट्रात भाजपला उभारी देण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केले
– मुंडे साहेबांना कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही, जे लढायचंय ते समोर, जे बोलायचं ते समोर बोलायचं
– मुंडे साहेब म्हणायचे, हम भी डुबेंगे सनम तुम्हे भी डुबकर मरेंगे..परंतू त्यांनी असे कधी केले नाही.
– पक्ष काढावा का असा खडसेंकडून उपस्थित कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
– जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ
– राजकीय व्यासपीठ नाही, राजकारणावर जास्त काही बोलता कामा नये, नाही बोलणार, पंकजाने सांगितले 10 मिनिटावर बोलू नका. पक्षा विरोधात बोलू नका.
– आज जे पक्ष करतोय ते महाराष्ट्राला मान्य नाही
– पंकजाला काही कारणाने बोलता येत नाही, पण तिच्या मनात वेदना आहेत ती सहन करत आहे.
– गोपीनाथ मुंडेची मुलगी पराजित झाली याचे दु:ख मला आहे, हे घडलं नाही घडवलं गेल, तुम्हाला मान्य आहे की नाही, मला मान्य आहे.
– मुंडे साहेबांनी उभं आयुष्य घातलं म्हणून तुम्ही आज मंत्री झाले, नेते झाले.
– पंकजाताई आणि मी काय ठरावावं तुम्ही सांगा. किती दिवस सहन करायचं आम्ही
– मी पक्ष सोडेल की नाही माहित नाही, पंकजाताईंचं सोडून द्या, माझं काही सांगता येत नाही
– जास्त उघड करु दाखलवं तर पक्षाचा शिस्तभंग होईल
– तिकिट कापून टाकलं, नाथाभाऊचा गुन्हा काय ते तर सांगा. तुम्हाला खात्री आहे पण यांना खात्री पटत नाही.
– त्यांना वाटत असे की नाथाभाऊ आता बाहेर जा, किती अपमान सहन करतात.
– पंकजाताई एकटी नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
– पंकजाताई वाघाची पोरगी आहे, वाघ नसला तरी वाघीण आहे.
– आता याच्यापुढंच बोलत नाही, जाऊ द्या, माझ्याकडे भरपूर काही आहे, फक्त येथे बोलायला वेळ नाही.
– माझ्या जीवनात जो प्रसंग आला, जी वेळ आली ती पंकजावर येई नये.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/