मी सोनू सूदला मारहाण करणार नाही, मेगास्टार चिरंजीवीने जोडले हात

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनच्या काळात बॉलीवूडचा अभिनेता सोनू सूदने हजारो परप्रांतीय कामगारांनना मदत करून अनेकांची मने जिंकली. एकेकाळी चित्रपटातून व्हिलनच काम करणाऱ्या सोनूची ही हिरोपंती त्याच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही भावली आहे. सोनूची लोकप्रियता वाढली असून रिल लाईफमधील व्हिलन रियल लाईफमध्ये हिरो बनला आहे. त्यामुळेच सोनू सूदला चित्रपटातही मारहाण करणार नाही, मी तसे केल्यास लोक मला नावे ठेवतील, माझ्या इमेजला धक्का बसेल असे दाक्षिणात्य चित्रपटांचा मेगा स्टार अभिनेता चिरंजीवी यांनी म्हटले आहे.

सोनू गरीबांच्या, पीडितांच्या मदतीसाठी कायमच धावून जातो. अडचणीत असलेल्यांना सढळ हस्ते मदत करणे हा आता सोनूच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. सोनूच्या ट्विटरवर चक्कर मारल्यास तुम्हाला त्याच्या कामाची आणि समाजाला वाहून घेतलेल्या कर्तव्याची जाणीव होईल. दोन दिवसांपूर्वीही तो एका कुटुंबास आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याची माहिती सोनूला समजताच त्याने मृतांच्या कुटूंबाशी संपर्क साधला आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. सतीश गुप्ता असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सोनूच्या सामाजिक कामामुळे चित्रपटासाठी त्याला अनेक दिग्दर्शकांकडून लीड रोल देण्यात येत आहेत. आचार्य सिनेमाच्या शुटींगवेळचा एक किस्सा सोनूने नुकताच सांगितला. चित्रपटातील एका दृश्यामध्ये सोनूला चिरंजीवकडून मारहाण करण्यात येणार होती. मात्र, चित्रपटातही मी तुला मारहाण करु शकत नाही. कारण, मी ते केल्यास लोक मला नावे ठेवतील, असे चिरंजीवीने म्हटल्याचे सोनूने सांगितले आहे. तसेच, एका दृश्यामध्ये सोनूच्या डोक्यावर चिरंजीव पाय ठेवतात, पण तोही सीन पुन्हा नव्याने बनविण्यात आला आहे. लॉकडाऊनमधील कामामुळे सोनूची प्रतिमा पूर्णत: बदलून गेली असून सोनू सूद यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू प्रथम क्रमांकावर
सोनूच्या कार्याची दखल घेत, लंडनमधील साप्ताहिक वर्तमानपत्र ईस्टन आयने प्रकाशित केलेल्या आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू सूदचा पहिला क्रमांक आहे. या स्थानावर विराजमान होण्यासाठी 47 वर्षीय सोनू सूदला अनेक दिग्गज सेलिब्रिटींशी स्पर्धा करावी लागली. आपल्या कामाच्या माध्यमातून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि लोकांना प्रेरित केले. त्या सेलिब्रिटींचा समावेश या यादीत केला आहे.